दुधाच्या एमआरपीचा प्रश्न पुन्हा जैसे थे

By admin | Published: May 4, 2015 02:03 AM2015-05-04T02:03:31+5:302015-05-04T02:03:31+5:30

पिशवीबंद दुधाच्या विक्रीवर अपुरे कमिशन मिळत असल्याच्या कारणास्तव दूध विक्रेत्यांनी पुकारलेले बहिष्काराचे आंदोलन १५ दिवसांसाठी स्थगित केले आहे

The question of the MRP of milk was again like that | दुधाच्या एमआरपीचा प्रश्न पुन्हा जैसे थे

दुधाच्या एमआरपीचा प्रश्न पुन्हा जैसे थे

Next

मुंबई : पिशवीबंद दुधाच्या विक्रीवर अपुरे कमिशन मिळत असल्याच्या कारणास्तव दूध विक्रेत्यांनी पुकारलेले बहिष्काराचे आंदोलन १५ दिवसांसाठी स्थगित केले आहे. मात्र एमआरपीहून चढ्या दराने होणारी दूध विक्री अद्यापही थांबलेली नाही.
एमआरपीहून अधिक किंमतीने दूध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कोर्टात केसेस दाखल करण्याची धडक मोहिम वैधमापन शास्त्र विभागाने सुरू केली. त्यामुळे ज्या पिशवीबंद दुधाच्या विक्रीवर पुरेसे कमिशन मिळत नाही, अशा कंपन्यांच्या दुधाची विक्री १ मेपासून न करण्याचा निर्णय विक्रेत्यांच्या संघटनेने घेतला होता. त्यात अमुल, महानंद, गोकूळ, मदर डेअरी आणि वारणा या पाच नामांकित कंपन्यांचा समावेश होता. त्यानुसार २० एप्रिलपासून ठाणे, दिवा परिसरात या पाचही कंपन्यांची दूध विक्री बहुतांश प्रमाणात थांबवण्यात आली होती. ग्राहकांची गैरसोय होऊ नये,
म्हणून विक्रेत्यांनी दुसऱ्या नामांकित दूध कंपन्यांची दूध विक्री सुरू केली होती.
अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनीही दूध कंपन्यांकडून विक्रेते आणि वितरकांना मिळणारे कमिशन हा कंपनीचा अंतर्गत मुद्दा असल्याचे वक्तव्य केले होते. शिवाय ग्राहकांना कोणताही त्रास झाल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कंपन्या आणि विक्रेता संघटनेच्या चर्चेत कमिशनवाढीवर चर्चा झाली. त्यात आंदोलनाला स्थगिती देण्याचा निर्णय झाला आहे.
ग्राहकांची लूट सुरूच
दूध शीतपेटीत ठेवण्यासाठी लागणारे विजबिल भरण्यासाठी कंपनीकडून अपुरे कमिशन
मिळत असल्याची विक्रेत्यांची तक्रार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The question of the MRP of milk was again like that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.