विद्यार्थ्यांचा आवश्यक दाखल्यांचा प्रश्न सुटला
By admin | Published: June 11, 2016 03:42 AM2016-06-11T03:42:00+5:302016-06-11T03:42:00+5:30
सातपाटी ग्रामपंचायतीमध्ये आयोजित केलेल्या विविध दाखलेवाटप कार्यक्रमाला सातपाटी व परिसरातील विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला.
पालघर : सातपाटी ग्रामपंचायतीमध्ये आयोजित केलेल्या विविध दाखलेवाटप कार्यक्रमाला सातपाटी व परिसरातील विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला. तहसीलदार डॉ. स्रेहल कनिचे यांच्या हस्ते दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
नुकतेच दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसोबत पालकांची धावपळ सुरू झाली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांना तहसीलदार कार्यालयातील सेतू कार्यालयात जाऊन विविध दाखल्यांची कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळेचा व पैशांचा अपव्यय होत असल्याने महसूल विभागाने आपल्या मंडळ अधिकारी कार्यसभेत विविध दाखल्यांचे शिबिर भरवण्याचे आयोजन केले आहे. या वेळी कोणत्याही विद्यार्थ्याचा दाखल्याअभावी प्रवेश थांबणार नाही, याची पूर्णपणे दक्षता घेण्याचे आदेश मी संबंधित यंत्रणेला दिल्याची माहिती तहसीलदारांनी या वेळी दिली.
>सेतू कार्यालयात आयोजन
सातपाटी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित दाखलेवाटप शिबिरामध्ये ७३ जातीचे दाखले, १४८ उत्पन्नाचे दाखले, ९ नॉन क्रिमीलेअरचे दाखले, २७ वय अधिवास दाखले, २५५ विविध दाखल्यांचे वाटप डॉ. कनिचे, सरपंच कांचन मेहेर, पंचायत समिती सदस्य मुकेश मेहेर आणि उपसरपंच विश्वास पाटील, माजी सरपंच विद्या माळी, मंडळ अधिकारी राजेंद्र पाटील इ. हस्ते दाखलेवाटप करण्यात आले.