महिला वाहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Published: July 6, 2016 11:58 PM2016-07-06T23:58:50+5:302016-07-06T23:58:50+5:30

परिवहन महामंडळाच्या बसेस्मध्ये कार्यरत असलेल्या महिला वाहकांच्या विविध समस्यांसोबतच त्यांची सुरक्षितताही धोक्यात येऊ पाहत आहे. मंगळवारी बसमध्ये एका तरुणीची

The question of safety of women carriers is on the anagram | महिला वाहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

महिला वाहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Next

जळगाव : परिवहन महामंडळाच्या बसेस्मध्ये कार्यरत असलेल्या महिला वाहकांच्या विविध समस्यांसोबतच त्यांची सुरक्षितताही धोक्यात येऊ पाहत आहे. मंगळवारी बसमध्ये एका तरुणीची छेड काढल्याने आता हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
परिवहन महामंडळात साधारण दहा वर्षांपासून महिला वाहक दिसू लागल्या. महिलांचे हे धाडस मानून त्याचे स्वागतही होऊ लागले. मात्र या महिलांच्या अनेक प्रश्नांकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
अशाच प्रकारे मंगळवारी एका महिला वाहकावर गंभीर प्रसंग ओढावल्याने ही बाब पुन्हा चर्चेत आली आहे.
मंगळवारी एका बसमध्ये प्रवास करणाऱ्या वाहक महिलेची (त्यावेळी सदर महिला ड्यूटीवर नव्हती) तरुणाने छेड काढली. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले.
या मध्ये सदर महिला ड्यूटीवर नसली तरी ज्या वेळी महिला वाहक म्हणून आपले कर्तव्य बजावत असतात तेव्हा त्यांचा सर्वाधिक संपर्क प्रवासी असलेल्या पुरुष वर्गाशीच येतो.
त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारे असुरक्षिततेचीच भावना असल्याचे सांगितले जात आहे.

विनाकारण वाद-विवाद....
बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी वेगवेगळे स्वभाव, वर्तवणुकीचे असतात. यामध्ये कोणी सहकार्यही करतात तर बहुतांश जण त्रास देणारेच असतात. यामध्ये महिला पाहून कोणत्या न कोणत्या कारणाने वाद-विवाद करणारे असतात.

मद्यपींचा अधिक त्रास.....
बसमध्ये प्रवास करणारी व्यक्ती कशी आहे, हे सांगता येत नाही. त्यात मद्यपान करुन बसणारे बरेच प्रवासी असतात.
यामध्ये नशेत अनेकजण महिला वाहकांशी अरेरावी करुन गैरवर्तवणूक करतात. त्यामुळे मद्यपी प्रवाशांचा या वाहक महिलांना अधिक त्रास होत असल्याचे समोर आले आहे.
वाहक महिलेची ड्यूटी संध्याकाळी सात पर्यंतच असली पाहिजे, असे असले तरी एखाद्या मार्गावर बस नादुरुस्त झाली तर त्यामध्ये उशीर होऊन रात्र होते. यामध्ये परिवहन महामंडळाचा सहकारी म्हणून केवळ चालकच असतो. मात्र अशा वेळी हा चालक बस दुरुस्त करणार की, महिलेच्या सुरक्षेकडे लक्ष देईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

उपाययोजना.....
महिला वाहकांच्या सुरक्षेसाठी एस.टी. प्रशासन काळजी घेते. या सोबतच प्रवाशांनी सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. या महिला वाहक प्रवाशांच्या सेवेसाठीच असतात, ही भावना जपली पाहिजे, असेही जाणकारांचे म्हणणे आहे.

२०० महिला वाहक....
जळगाव जिल्ह्यात २०० महिला वाहक कार्यरत आहेत. या महिला नित्यनियमाने सेवा देत असतात. मात्र प्रवाशांकडून निर्माण होणाऱ्या विविध समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. या सोबतच विश्रामगृह, शौचालय असे अनेक प्रश्नांना ड्यूटीवर असताना महिलांना सामोरे जावे लागते.

भरतीचाही विचार केला जाणार
महिला वाहकांच्या सुरक्षेचा प्रश्न राज्यभरात समोर येऊ लागल्याने या पुढे भरती करताना महिला तर घ्यायच्या मात्र त्यांना वाहकाचे काम न देता कार्यालयीन काम देण्याच्या विचारात सरकार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले. कारण रात्रीची ड्यूटी, मुक्कामाचे ठिकाण यामुळे अनेक प्रश्न पुढे येऊ लागले आहे.

कार्यालयीन कामकाज हवे
परिवहन महामंडळात नियमानुसार ३३ टक्के आरक्षित जागेवर महिला असाव्यात, याला विरोध नाही. मात्र महिला वर्गाला लिपीक, वाहतूक नियंत्रक अथवा इतर कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी द्यावी, असा सूर आता व्यक्त होत आहे.

महिला वाहकांच्या सुरक्षेसाठी एस.टी प्रशासन काळजी घेते. मात्र प्रवाशांनीही सहकार्य केले पाहिजे. महिला वाहकांच्या विविध प्रश्नांसदर्भात परिवहनमंत्र्यांची भेट घेणार आहे. - राखी शर्मा,
सदस्या, राष्ट्रीय महिला सुरक्षा समिती

Web Title: The question of safety of women carriers is on the anagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.