एचए कंपनी कामगारां वेतनाचा आणि पुर्नवर्सनाचा प्रश्न सुटणार
By admin | Published: August 24, 2016 04:37 PM2016-08-24T16:37:25+5:302016-08-24T16:37:25+5:30
पिंपरी येथील हिंदुस्थान अॅन्टीबायोटिक्स कंपनीच्या पुर्नवर्सनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची आज बैठक झाली.
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 24 : पिंपरी येथील हिंदुस्थान अॅन्टीबायोटिक्स कंपनीच्या पुर्नवर्सनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची आज बैठक झाली. पिंपरी-चिंचवड शहरात एका कार्यक्रमासाठी पवार आले होते. त्यावेळी एचए कंपनीच्या प्रश्नाबाबत पवार म्हणाले,दिल्ली येथे पंतप्रधान मोदी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. यासंदर्भात मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एचएबाबत सूचना केल्या आहेत.
कंपनीच्या एकुण जागेपैकी सुमारे १५ एकर जागा म्हाडाला देऊन त्यातून मिळणाऱ्या रकमेतून कर्मचाऱ्यांचा वीस महिन्यांचे वेतन आणि पुर्नवर्सन करावे, तसेच म्हाडाला मिळालेल्या जागेतून गरीबांसाठी गृहप्रकल्प उभारावा, अशी सूचना मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यामुळे कामगारांचा वेतनाचा आणि पुर्नवर्सनाचा प्रश्न सुटणार आहे.