कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 09:58 AM2024-10-02T09:58:54+5:302024-10-02T09:59:08+5:30

राज्याच्या आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांत ठाणे जिल्ह्याची आकडेवारी १८.३४ टक्के इतकी आहे.

Questions of Kathore, Awad, Kelkar; Leading the Fourteenth Legislative Assembly; Naik, Jain Bottom | कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी

कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी

- नारायण जाधव
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सरत्या अर्थात १४ व्या विधानसभेच्या स्थापनेपासून पार पडलेल्या १२ अधिवेशनात राज्यातील विविध पक्षांच्या आमदारांनी ३१,४८४ प्रश्न विचारले असून, यापैकी अनेक प्रश्नांची पुनरावृत्ती आहे. यामुळे असे प्रश्न वगळून युनिक प्रश्नांची संख्या ५९२१ 
असून, त्यात ठाणे जिल्ह्यातील आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्या १०८६ असल्याचे संपर्क संस्थेने आपल्या  विश्लेषण अहवालात म्हटले आहे. 

राज्याच्या आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांत ठाणे जिल्ह्याची आकडेवारी १८.३४ टक्के इतकी आहे. यात सर्वाधिक २७५ प्रश्न  मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी  विचारले असून, त्याखालोखाल कळवा-मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी २६६ प्रश्न विचारले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर संजय केळकर २२१ यांचे आहेत. जिल्ह्यात सर्वांत  कमी १२ प्रश्न ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी विचारले आहेत.

आमदारनिहाय प्रश्नसंख्या
आमदाराचे नाव    प्रश्न 
महेश चौगुले    ३८
प्रमोद पाटील    ८४
गणेश नाईक    १२
बालाजी किणीकर    १२१
शांताराम मोरे    ६२
कुमार आयलानी    ११६
किसन कथोरे    २७५
गणपत गायकवाड    १५२
दौलत दरोडा    १५७
मंदा म्हात्रे    ७०
विश्वनाथ भोईर    ५३
गीता जैन    २७
संजय केळकर     २२१
रईस शेख    १७५
जितेंद्र आव्हाड    २६६
प्रताप सरनाईक    ९६

मतदारसंघाचा विचार करता ठाणे 
हा मुंबई, पुण्यानंतरचा सर्वाधिक आमदार असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील १८ पैकी मंदा म्हात्रे आणि गीता जैन या दोन महिला आमदार आहेत. 

विषयनिहाय विचारलेले प्रश्न
१४ व्या विधानसभेत महिला व मुलींविषयी ३४, तर आरोग्यावर १००, शालेय शिक्षण ६४, मनुष्यबळ ४८, बालकांवर ४२, आदिवासींविषयी ३८, पर्यावरण ३९, पाणी  ३३,  वीज २०, शेती १०, सिंचनन रोहयो प्रत्येकी ३, पोषण आहारावर दोन प्रश्न विचारले गेले.
 

Web Title: Questions of Kathore, Awad, Kelkar; Leading the Fourteenth Legislative Assembly; Naik, Jain Bottom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.