आर नॉर्थ वॉर्ड : अंतर्गत लाथाळ्यांची सर्वच पक्षांना धास्ती

By admin | Published: December 29, 2016 02:06 PM2016-12-29T14:06:56+5:302016-12-29T14:50:51+5:30

उत्तर मुंबईतील या वॉर्डात गेल्या काही वर्षांपासून अस्वस्थतेचे राजकारण रंगले आहे. एकमेकांचे पत्ता कापणे आणि अंतर्गत लाथाळ्यांनी सर्वच पक्ष बेजार झाले आहेत.

R North Ward: All parties of Laodlea are scared | आर नॉर्थ वॉर्ड : अंतर्गत लाथाळ्यांची सर्वच पक्षांना धास्ती

आर नॉर्थ वॉर्ड : अंतर्गत लाथाळ्यांची सर्वच पक्षांना धास्ती

Next

शिवसनेसमोर नेतृत्वाचा गुंता
- गौरीशंकर घाळे
मुंबई : मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पहिला वॉर्ड म्हणजे आर नॉर्थ. उत्तर मुंबईतील या वॉर्डात गेल्या काही वर्षांपासून अस्वस्थतेचे राजकारण रंगले आहे. एकमेकांचे पत्ता कापणे आणि अंतर्गत लाथाळ्यांनी सर्वच पक्ष बेजार झाले आहेत.
महापालिका निवडणुकांचा विचार केला तर गेली अनेक वर्षे या वॉर्डाने शिवसेनेला चांगले यश दिले. २०१२ च्या निवडणुकीत मनसेचे वादळ असतानाही सात पैकी पाच जागांवर शिवसेनेचा भगवा फडकला. पक्ष संघटनेने नेते-कार्यकर्ते घडवायचे आणि त्यांनी पक्ष संघटना बळकट ठेवायची या परस्परपूरक सुत्रामुळे या भागात शुभा राऊळ, शीतल म्हात्रे, विनोद घोसाळकर असे अनेक बिनीचे शिलेदार तयार झाले. दुर्दैवाने नेत्यांची ही मांदियाळीच आता शिवसेनेच्या गर्तेत आणणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘मातोश्री’शी जवळीक असणा-या विनोद घोसाळकरांविरोधातील नाराजी आणि तक्रारीने शिवसेनेची अवस्था निर्नायकी बनली आहे. एकेकाळी ज्या भागात निर्विवाद सत्ता गाजविली त्याच भागात घोसाळकरांसमोर स्वत:ची प्रतिमा जपण्याचे मोठे आवाहन आहे.
विनोद घोसाळकरांवरील नाराजीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला शिवसेना नेते रामदास कदम यांच्याकडे हा भाग सोपविण्यात आला. परंतु राज्याच्या राजकारणातील या दिग्गज नेत्याला इतक्या स्थानिक पातळीवर राजकारणासाठी आवश्यक वेळ देणे अशक्यच. पुढे राष्ट्रवादीतून आलेले प्रकाश सुर्वे शिवसेनेच्या तिकीटावर आमदार झाले. एकंदर नेत्यांची मोठी यादी असली तर पक्षसंघटना एकसंध राखेल अशा नेतृत्वाचा या अभाव शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
त्यातच भाजपाने पद्धतशीपरपणे या भागात स्वत:चे बस्तान बसविले आहे. कोळीवाडे, आगरी, कोकणी मराठी माणूस हा शिवसेनेचा हक्काचा मतदार. परंत अस्मितेच्या राजकारणार विकासाचीच कामे राहून गेली. भाजपाने हे नेमकेपणाने हेरले. लोकांना सहज नजरेस पडतील अशी विकासकामे करत, विविध समाजघटक पद्धतशीरपणे स्वत:शी जोडण्यात भाजपा यशस्वी झाली आहे. गेल्या दोन वर्षात कोळीवाड्यांमध्ये भाजपाबद्दल अनुकुल वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. जोडीला भाजपाची हक्काची गुजराती मते आहेतच. युती फिस्कटलीच तर भाजपाचे आव्हान मोडणे शिवसेनेला अत्यंत अवघड जाण्याची शक्यता आहे.
मागील निवडणुकीत मनसेच्या पदरात एक जागा पडली होती. तर, चार ठिकाणी दुस-या क्रमांकाची मते मनसेने मिळवली. मात्र आमदार प्रवीण दरेकर यांनी भाजपा प्रवेश केल्याने त्यांचे बंधू आणि विद्यमान नगरसेवक प्रकाश दरेकरही भाजपावासी बनले आहेत. तशीच काहीशी अवस्था राष्ट्रवादीची आहे. प्रकाश सुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी येथे नाममात्र राहीली आहे.

वनहद्दीचा प्रश्न
केतकी पाडा, धारखाडी, डायमंड इस्टेट, वैशाली नगर आणि दहिसर चेक नाकयाचा समावेश असणा-या प्रभाग क्रमांक तीनमध्ये वनहद्दीचा प्रश्न अद्याप निकाली निघाला नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे या भागात वास्तव्य करणा-या लोकासंमोर पिण्याच्या पाण्यासारख्या मुलभूत समस्या आ वासून उभ्या आहेत.

झोपडपट्टी पुर्नवसनाचा प्रश्न
या वॉर्डातील बहुतांश भाग झोपडपट्टी आणि जुन्या इमारतींच्या पुर्नविकासाचा प्रश्न आहे, अनेक ठिकाणी झोपु योजनांचे गाडे रखडले आहे. रखडलेल्या प्रकल्पांमुळे रहिवाशी मेटाकुटीला आले आहेत.

अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडी
मुंबईचा प्रवेशद्वार असणा-या या वॉर्डातील बहुतांश रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी ही सर्वकालीक आणि सार्वत्रिक अनुभव आहे. दहिसर चेकनाक्यावरील कोंडीत २-३ तास सहज जातात. चेकनाक्याकडून पश्चिम द्रुतगती महामार्गाप्रमाणेच अहमदाबाद महामार्ग आणि ठाण्याकडून येणारी वाहतूक होते. तासन्तास होणा-या कोंडीसमोर पोलिसांचे सारे प्रयत्न निष्फळ ठरतात.

अनधिकृत फेरीवाले
अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडी या वॉर्डातील नित्याची समस्या असल्या तरी अनधिकृत फेरीवाल्यांमुळे हा प्रश्न अधिकच जटील बनला आहे. अनेक ठिकाणी निम्म्याहून अधिक रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या या फेरीवाल्यांमुळे वाहतूक व्यवस्थेचा अक्षरश: विचका झाला आहे.
------------------------------------
गणपत पाटील नगर, बोरीवली आरटीओ, दहिसर नदी, आयसी कॉलनी, अवधूत नगर, आनंद नगर, एनएम संकुल, सुधींद्र नगर, केतकी पाडा, धारखाडी, डायमंड इंडस्ट्रीयल इस्टेट, वैशाली नगर, दहिसर चेक नाका, घरटन पाडा, कोकणी पाडा, एकता नगर, रावळपाडा, अशोकवन, चोगले नगर, गणेश नगर, चिंतामणी नगर, एसटी डेपो, रतन नगर, आंबेवाडी, ओवरी पाडा, मराठा कॉलनी, मानव कल्याण केंद्र, दहिसर नदी , नवा गांव, कांदरपाडा, मेरी इमॅक्युलेट शाळा, सेंट फ्रांसिस शाळा, भगवती हॉस्पिटल, एलआयसी कॉलनी, मंडपेश्वर कॉलनी आदी भागाचा या वॉर्डात समावेश होतो.

नवीन रचना
१ खुला महिला
२ खुला
३ खुला
४ खुला महिला
५ इतर मागासवर्ग
६ इतर मागासवर्ग
७ इतर मागासवर्ग
८ खुला


प्रभाग क्रमांक १
आरक्षण - खुला महिला
एकूण लोकसंख्या - ४९९४०
अनुसूचित जाती - १०८७
अनुसूचित जमाती - ३९०
प्रभागाची व्याप्ती - गणपत पाटील नगर, बोरीवली आरटीओ, दहिसर नदी, आयसी कॉलनी.


प्रभाग क्रमांक २
आरक्षण - खुला
एकूण लोकसंख्या - ५६०१६
अनुसूचित जाती - १९७५
अनुसूचित जमाती - ५२९
प्रभागाची व्याप्ती - अवधूत नगर, आनंद नगर, एनएम संकुल, सुधींद्र नगर

प्रभाग क्रमांक ३
आरक्षण -खुला
एकूण लोकसंख्या - ५७४७१
अनुसूचित जाती - ३६९३
अनुसूचित जमाती - ८२५
प्रभागाची व्याप्ती - केतकी पाडा, धारखाडी, डायमंड इंडस्ट्रीयल इस्टेट, वैशाली नगर, दहिसर चेक नाका

प्रभाग क्रमांक ४
आरक्षण - खुला महिला
एकूण लोकसंख्या - ५९०८३
अनुसूचित जाती - १२०४
अनुसूचित जमाती - ९२३
प्रभागाची व्याप्ती - घरटन पाडा, कोकणी पाडा, एकता नगर, रावळपाडा.

प्रभाग क्रमांक ५
आरक्षण - इतर मागासवर्ग
एकूण लोकसंख्या - ५८०४९
अनुसूचित जाती - १५३५
अनुसूचित जमाती - ८२८
प्रभागाची व्याप्ती - अशोकवन, चोगले नगर, गणेश नगर, चिंतामणी नगर, एसटी डेपो.

प्रभाग क्रमांक ६
आरक्षण - इतर मागासवर्ग
एकूण लोकसंख्या - ५२७७३
अनुसूचित जाती - १५५७
अनुसूचित जमाती - ७०७
प्रभागाची व्याप्ती - रतन नगर, आंबेवाडी, ओवरी पाडा, मराठा कॉलनी, मानव कल्याण केंद्र

प्रभाग क्रमांक ७
आरक्षण - इतर मागासवर्ग
एकूण लोकसंख्या - ४९१२५
अनुसूचित जाती - १४२७
अनुसूचित जमाती - ८७१
प्रभागाची व्याप्ती - दहिसर नदी , नवा गांव, कांदरपाडा

प्रभाग क्रमांक ८
आरक्षण - खुला
एकूण लोकसंख्या - ४८९११
अनुसूचित जाती - १५८२
अनुसूचित जमाती - ५२४
प्रभागाची व्याप्ती - मेरी इमॅक्युलेट शाळा, सेंट फ्रांसिस शाळा, भगवती हॉस्पिटल, एलआयसी कॉलनी, मंडपेश्वर कॉलनी.



२०१२ च्या निवडणुकीतील विजयी आणि पराभूत उमेदवार

वॉर्डविजयी उमेदवारमतेपराभूत उमेदवारमते
१अभिषेक घोसाळकर, शिवसेना ८२७५ राजेंद्र चौबे, राष्ट्रवादी ६३७५
२शितल म्हात्रे, शिवसेना १०६८६श्रद्धा कांबळी, मनसे ६३६७
३ शितल म्हात्रे, काँग्रेस ७५७६वृषाली बागवे, शिवसेना ६१५८
४उदेश पाटेकर, शिवसेना ८७४७सचिन शिरवडकर, मनसे ८४२८
५प्रकाश दरेकर, मनसे १०५२६संजय घाडी, शिवसेना ९४०४
६हंसाबेन देसाई, शिवसेना १३१४२मनिषा जोशी, मनसे ५११९
७शुभा राऊल, शिवसेना १३२०७शीतल चुरी, मनसे ४५४०

Web Title: R North Ward: All parties of Laodlea are scared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.