आर. आर. पाटलांची उंची केव्हा मोजणार?
By admin | Published: October 1, 2014 01:49 AM2014-10-01T01:49:55+5:302014-10-01T01:49:55+5:30
पोलीस भरतीत उमेदवारांची उंची मोजली जाते. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची उंची कें व्हा मोजणार, अशी उपहासात्मक टीका राज ठाकरे यांनी वलगाव येथे मंगळवारी जाहीर सभेत केली.
Next
>अमरावती : पोलीस भरतीत उमेदवारांची उंची मोजली जाते. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची उंची कें व्हा मोजणार, अशी उपहासात्मक टीका राज ठाकरे यांनी वलगाव येथे मंगळवारी जाहीर सभेत केली.
राज्यभरातील सुरक्षा रक्षकांच्या कंपन्या या परप्रांतीयांच्या हाती असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जनतेने बहुमताचा कौल दिल्यास राज्यात एकही परप्रांतीय सुरक्षा रक्षक दिसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली़
आघाडी, महायुतीचा जागा वाटपाचा मुद्दा म्हणजे नंगा नाच होय, असे सांगत राज यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या चारही पक्षांना सामान्य जनतेचे काहीही घेणो देणो नाही. या पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी हितसंबंध असून एकाने मारल्यासारखे करायचे, तर दुस:याने रडल्यासारखे वागायचे असा जनतेला फसवणुकीचा फंडा सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात सत्ताधारी, विरोधक एकत्र आल्यामुळे सिंचन घोटाळा, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी वाढली असून, या आघाडी सरकारमुळे महाराष्ट्राचे वाटोळे झाल्याचा घणाघात राज यांनी केला.
राज्यात सिंचनात 7क् हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असताना अजित पवार धरणात पाणी नाही तर असभ्य भाषेचा वापर करतात़ यांना जनता कधी धडा शिकवणार, असा सवाल राज ठाकरे यांनी उस्थित केला. वेगळय़ा विदर्भाची मागणी ही काही व्यक्तींच्या राजकीय सत्तासुखासाठीची आहे. जिजाऊचा जन्म विदर्भाच्या मातीतला. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला तोडण्याचे पाप कदापीही करु देणार नाही, अशी गजर्ना त्यांनी केली. (प्रतिनिधी)
च् राज म्हणाले, महाराष्ट्रात 6क् हजार शेतक:यांनी आत्महत्या केल्या. हळहळ व्यक्त झाली. परंतु आपले मुख्यमंत्री होर्डिग लावतात ‘महाराष्ट्र नं. 1’ वर आहे. तो कशामध्ये तर सिंचन घोटाळ्यात, पैसे खाण्यात?, आणि बलात्कारात. मुख्यमंत्री म्हणजे नुसतं बुजगावणं. आणून बसवलं दिल्लीतून. हालतही नाही अन् बोलतही नाही. त्याचा उपयोग काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.