रबीचे क्षेत्र अर्ध्यावर

By admin | Published: November 27, 2014 12:18 AM2014-11-27T00:18:41+5:302014-11-27T00:18:41+5:30

अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम बुडाला. आता रबी हंगामाचीही अशीच परिस्थिती आहे. पाण्याची पातळी खाली गेल्याने नागपूर जिल्ह्यातील रबी हंगामाचे क्षेत्र अर्ध्यावर आले आहे.

Rabi area is semi-urban | रबीचे क्षेत्र अर्ध्यावर

रबीचे क्षेत्र अर्ध्यावर

Next

कमी पावसाचा परिणाम : गहू, हरभरा उत्पादक संकटात
नागपूर : अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम बुडाला. आता रबी हंगामाचीही अशीच परिस्थिती आहे. पाण्याची पातळी खाली गेल्याने नागपूर जिल्ह्यातील रबी हंगामाचे क्षेत्र अर्ध्यावर आले आहे.
जिल्ह्याचे रबी हंगामाचे सरासरी क्षेत्र १४४६३० हेक्टर आहे. २६ नोव्हेंबरपर्यंत ३९ टक्के म्हणजेच ५६,८९३ हेक्टर क्षेत्रात पेरणी आहे. १५ डिसेंबरपर्यत गव्हाची पेरणी शक्य आहे. यात १० ते १५ हजार हेक्टर क्षेत्राची भर पडण्याची आशा आहे. असे असले तरी सरासरीच्या ५० ते ५५ टक्के क्षेत्रात रबी हंगाम घेतला जाणार आहे. पारशिवनी तालुक्यात सर्वात कमी ७ टक्के तर काटोल व रामटेक तालुक्यात सर्वाधिक ७५ टक्के पेरणी झाली आहे. ३००० हेक्टर क्षेत्रात ज्वारीचे पीक घेतले जाते. यंदा ६३१ हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली आहे.
गव्हाच्या ८५००० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २२१४३ तर ९५००० च्या तुलनेत २८४९५ हेक्टर क्षेत्रात हरभरा लावण्यात आला आहे. गळीत पिकांनाही फटका बसला आहे. २५०० च्या तुलनेत ३३१ हेक्टरमध्ये जवस , ४०० च्या तुलनेत १७३ हेक्टरमध्ये करडई, ३०० हेक्टर क्षेत्रात तीळाचे पीक घेतले जाते. यावर्षी २९ हेक्टर क्षेत्रात हे पीक घेतले जात आहे. रबीच्या इतर पिकांचीही अशीच अवस्था आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने रबी हंगामाचे नियोजन केले होते. गेल्या पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊ स पडला. त्यामुळे जमिनीत ओलवा नसल्याने गहू व हरभऱ्याच्या पिकाला फटका आहे. तसेच अनेक गावात उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rabi area is semi-urban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.