रेबीजमुळे मृत्यू वाढले

By admin | Published: May 20, 2016 01:26 AM2016-05-20T01:26:58+5:302016-05-20T01:26:58+5:30

शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली

Rabies cause death due to death | रेबीजमुळे मृत्यू वाढले

रेबीजमुळे मृत्यू वाढले

Next


पुणे : शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून जानेवारीपासून आतापर्यंत ९ रुग्णांचा रेबीजने मृत्यू झाला आहे. इतक्या कमी कालावधीत होणारे मृत्यू धोकादायक असून, महापालिका या समस्येकडे कितपत गांभीर्याने पाहते असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या ५० हजारांच्या घरात पोचली आहे. महापालिकेतर्फे यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असली तरीही ती पुरेशी नाही. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि महापालिकेत या कामासाठी असणारे अपुरे मनुष्यबळ यामुळे या समस्येवर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला अपयश येत असल्याचे दिसते.
परिणामी चालू वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतच ५३१३ व्यक्तींना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. तर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मासिक आकडेवारीनुसार पुण्यात दर महिन्याला एक ते दीड हजार नागरिक भटक्या कुत्र्यांच्या दहशतीला बळी पडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. चालू वर्षी पुणे शहरात जानेवारी - ३, मार्च -४, एप्रिल - १ व चालू मे महिन्यात १ असे एकूण ९ रुग्णांचा रेबीजने मृत्यू झाला आहे. जानेवारीत १,७२८, फेब्रुवारीत १,९१७ नागरिकांना, तर मार्चमध्ये १,६६८ नागरिकांना कुत्री चावली आहेत.
गेल्या काही वर्षांपासून शहरात भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाचा आलेख वाढला आहे. गेल्या वर्षभरात शहरात तब्बल १८,५६७ नागरिकांना कुत्र्यांच्या चाव्याचा सामना करावा लागला आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. यामध्ये प्रीव्हेन्शन आॅफ क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल्स अ‍ॅक्ट १९६०, अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल (डॉग) रुल्स २००१, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम (बीपीएससी अ‍ॅक्ट) ६४ नुसार रेबीज प्रतिबंधात्मक उपचार देणे, बीपीएमपी अ‍ॅक्ट ६६ (२४) नुसार रेबीज झालेल्या कुत्र्यांना ठार मारण्यात येते. तसेच पालिकेच्या कुत्रा बंदोबस्त विभागामार्फत शहरातील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांवर कारवाई केली जाते. त्यासाठी चारही झोनमध्ये महापालिकेच्या ४ गाड्या आहेत. प्रत्येक गाडीने दिवसाला २० कुत्री पकडली जातात. त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया करून रेबीज प्रतिबंधात्मक लस देण्यात येते. त्यानंतर नियमानुसार पुन्हा पकडलेल्या ठिकाणीच सोडण्यात येते.
पालिकेकडून अशापद्धतीने कुत्र्यांचे निर्बीजीकरण होत असले, तरी प्रत्यक्ष कुत्र्यांची संख्या म्हणावी तितकी कमी झालेली नाही. त्यामुळे कुत्र्यांचा चावा नागरिकांसाठी धोकादायक ठरत असल्याचे दिसते. २०१२च्या एका अहवालानुसार, भारतात किमान २० हजार रेबीजची प्रकरणे समोर येतात तर, मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे.
>शहरातील भटक्या कुत्र्यांची ठोस आकडेवारी सांगता येत नसली तरी रस्त्यांवर ५० हजारांहून अधिक भटकी कुत्री असल्याचा अंदाज आहे. त्या तुलनेत कुत्र्यांच्या होणाऱ्या नसबंदी शस्त्रक्रियांची संख्या खूपच कमी असल्याचे दिसते. गेल्या वर्षभरात ११ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले आहे. ही निबीर्जीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर करण्याची आवश्यकता आहे. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे ते शक्य होत नसल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे.

Web Title: Rabies cause death due to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.