स्वीकृत सदस्य निवडीवरून पुणे महापालिकेत भाजपामध्ये राडा
By admin | Published: April 18, 2017 03:30 PM2017-04-18T15:30:03+5:302017-04-18T19:46:22+5:30
स्वीकृत सदस्य निवडीवरून पुणे महापालिकेत भारतीय जनता पार्टीतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 18 - स्वीकृत सदस्य निवडीवरून पुणे महापालिकेत भारतीय जनता पार्टीतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे.
माजी गटनेते गणेश बीडकर आणि गणेश घोष यांच्यात मंगळवारी जोरदार हाणामारी झाली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचे कार्यालय भाजपच्याच कार्यकर्त्यांनी फोडले. स्वीकृत सदस्य निवडीसाठी आज दुपारी तीन ते चार या वेळेत अर्ज भरण्याची मुदत होती.
भारतीय जनता पार्टीकडून कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता होती. महापालिका निवडणुकीत पराभव झालेले माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांनी जोरदार लॉबिंग केले होते. गणेश घोष यांच्या नावाचीही चर्चा होती. त्यामुळे दोन्ही बाजुचे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. यातून बीडकर आणि घोष यांच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली.