उल्हासनगर महासभेत राडा
By admin | Published: January 9, 2015 10:57 PM2015-01-09T22:57:00+5:302015-01-09T22:57:00+5:30
महापालिका महासभेत अशासकीय प्रस्तावाद्वारे अधिकाऱ्याला उपायुक्तपदी बढती देण्यावरून महासभेत प्रचंड राडा झाला
प्रकाश वराडकर- रत्नागिरी -मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाकरिता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागणाऱ्या वाढीव जमिनीच्या मोजणीचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी दोन्ही जिल्ह्यात १५७२ हेक्टर्स जमिनीची आवश्यकता असून, सध्याच्या महामार्गाची ७९९.४९ हेक्टर्स जागा शासनाच्या ताब्यात आहे. त्यामुळे चौपदरीकरणासाठी आणखी ७७३ हेक्टर्स जमिनीचे संपादन केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी विभागाच्या सुत्रांनी दिली.
महामार्ग चौपदरीकरणासाठी आवश्यक असलेल्या वाढीव जागेच्या मोजणीचे काम १२ डिसेंबर २०१४पासून राष्ट्रीय महामार्ग विभाग व भूमी अभिलेखतर्फे सुरू करण्यात आले आहे. मुंबई - गोवा महामार्गातील २०६.३२ किलोमीटर्सचा रस्ता रत्नागिरी जिल्ह्यात आहे. या चौपदरीकरणासाठी इंदापूर ते खवटी -ओझरखोल, ओझरखोल ते राजापूर, राजापूर ते झाराप असे टप्पे ठरविण्यात आले आहेत.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील मुुंबई - गोवा महामार्गावर मोठे २९, तर छोटे ५८ पूल उभारण्यात येणार आहेत. कशेडी ते ओझरखोल या पहिल्या टप्प्यात १५ मोठे पूल असून, त्यातील १३ नवीन दुपरी होणार आहेत, तर दोन नवीन पूल चारपदरी होणार आहेत. ओझरखोल ते राजापूर या दुसऱ्या टप्प्यात चार मोठे पूल असून, त्यातील एक नवीन चारपदरी, तर तीन नवीन दुपदरी पुलांचा समावेश आहे. राजापूर ते झाराप या तिसऱ्या टप्प्यात १० मोठे पूल असून, हे सर्व चारपदरी होणार आहेत. हे सर्व मोठे पूल ३० मीटर्सपेक्षा अधिक लांबीचे आहेत.
३० मीटरपेक्षा कमी लांबीचे ५८ पूल दोन्ही जिल्ह्यात होणार असून, कशेडी ते ओझरखोल या पहिल्या टप्प्यात असे १५ छोटे पूल असून, त्यातील १३ नवीन दुपदरी आणि २ नवीन चार पदरी पुलांचा समावेश आहे.
ओझरखोल ते राजापूर या दुसऱ्या टप्प्यात १७ छोटे पूल असून, १२ नवीन चारपदरी, तर पाच नवीन दोन पदरी पुलांचा समावेश आहे. राजापूर ते झाराप या तिसऱ्या टप्प्यात २६ छोटे पूल असून, १२ नवीन चार पदरी, १४ नवीन दोन पदरी पुलांचा समावेश आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने आता चांगलाच वेग घेतला आहे. (प्रतिनिधी)
मोजणीचे काम सुरू...
गेल्या १५ दिवसांपासून महामार्ग चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या वाढीव जागेच्या मोजणीचे काम सुरु झाले आहे. मात्र, कोकणातील अनुभवानुसार मोजणी करणाऱ्यांना विरोधाची झळ गेल्या १५ दिवसातच सोसावी लागली आहे. केंद्रीय रस्ते मंत्रालयाकडून महामार्ग चौपदरीकरणाचा आराखडा आल्याने अनेक वळणे सरळ करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन संपादनात काही ठिकाणी एकाच बाजूची जागा जाणार आहे. त्याबाबत संबंधित जमीन मालकांकडून काही आक्षेप आल्याने पाली, मराठेवाडी, खानू व अन्य काही भागातील मोजणीचे काम पंचयादी घालून तहकूब ठेवण्यात आले आहे. जमीन मालकांच्या सूचना केंद्र सरकारकडे पाठविल्या जाणार आहेत.