Corona Vaccination: “केंद्राने दुजाभाव केला असता, तर लसीकरणात राज्य आघाडीवर असते का”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 06:52 PM2021-04-30T18:52:18+5:302021-04-30T18:54:50+5:30

Corona Vaccination: केंद्र सरकारने दुजाभाव केला असता, तर राज्य लसीकरणात आघाडीवर असते का, अशी विचारणा भाजपकडून करण्यात आली आहे.

radhakrishna vikhe patil criticised maha vikas aghadi govt over corona vaccination in the state | Corona Vaccination: “केंद्राने दुजाभाव केला असता, तर लसीकरणात राज्य आघाडीवर असते का”

Corona Vaccination: “केंद्राने दुजाभाव केला असता, तर लसीकरणात राज्य आघाडीवर असते का”

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपचा ठाकरे सरकारवर निशाणामुख्यमंत्र्यांच्या घोषणांची पूर्तता झाली का? - विखे-पाटीलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला - विखे-पाटील

नगर: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनावरील नियंत्रणासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, देशातील लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. मात्र, कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील पात्र व्यक्तींचे लसीकरण शक्य नसल्याचे म्हटले आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात असताना, केंद्र सरकारने दुजाभाव केला असता, तर राज्य लसीकरणात आघाडीवर असते का, अशी विचारणा भाजपकडून करण्यात आली आहे. (radhakrishna vikhe patil criticised maha vikas aghadi govt over corona vaccination in the state)

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. लस पुरवठ्यात केंद्र सरकार दुजाभाव करीत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत, तर दुसरीकडे राज्य लसीकरणात आघाडीवर असल्याचे सांगून पाठ थोपटून घेत आहेत. जर केंद्राने दुजाभाव केला असता तर महाराष्ट्राला एवढी लस मिळाली असती का? केंद्राच्या सहकार्याशिवाय लसीकरणात राज्याला प्रगती करता आली असती का? अशी विचारणा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. 

आमची प्रतिमा डागाळली; निवडणूक आयोगाची मद्रास हायकोर्टात याचिका

मुख्यमंत्र्यांच्या घोषणांची पूर्तता झाली का?

राज्य सरकारने दुसऱ्या लॉकडाउनची घोषणा केली, मात्र पहिल्या लॉकडाउनच्या काळात मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना मदतीच्या ज्या घोषणा केल्या होत्या, त्याची पूर्तता झाली का, असा सवाल करत मुख्यमंत्र्याच्या मगील घोषणेनंतरही गरजूना धान्य मिळालेले नाही. सामान्य माणसाची उपासमार सुरूच आहे. आता किमान दुसऱ्यांदा झालेल्या घोषणांची तरी अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

केंद्र, राज्यांसाठी लसींच्या किमती वेगळ्या का? सुप्रीम कोर्टाची सरकारला विचारणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला

देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला. असे असूनही केंद्र सरकार लसीकरणात दुजाभाव करते हा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा आरोप आश्चर्यकारक वाटतो, असा टोला विखे पाटील यांनी लगावला आहे.

“आतातरी काहीतरी करा”; १०० प्रसिद्ध शास्त्रज्ञांचे पंतप्रधान मोदींना पत्र

दरम्यान, महसूल मंत्र्यांनी लिहिलेले हे पत्र म्हणजे स्वत:ची अब्रू झाकण्याचा प्रकार आहे. एक वर्षापासून करोनाचे संकट आहे. महसूल मंत्र्याना सुविधांचा अभाव असल्याचे आता कळाले काॽ फक्त फार्स करायचा आणि स्वतःचे अपयश झाकण्यासाठीचा हा पत्रव्यवहार आहे, असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. 
 

Web Title: radhakrishna vikhe patil criticised maha vikas aghadi govt over corona vaccination in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.