रेडिओलॉजिकल संघटनेचा उद्यापासून देशव्यापी बंद
By Admin | Published: August 30, 2016 05:57 PM2016-08-30T17:57:40+5:302016-08-30T17:57:40+5:30
डिओलॉजिकल अॅन्ड इमिजन असोसिएशनच्या वतीनं आरोग्य मंत्रालयाकडून लागू केलेल्या कायद्यातील त्रुटी संबंधात शासनाचं लक्ष वेधण्यासाठी येत्या १ सप्टेंबरपासून देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे
>- ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 30 - रेडिओलॉजिकल अॅन्ड इमिजन असोसिएशनच्या वतीनं आरोग्य मंत्रालयाकडून लागू केलेल्या कायद्यातील त्रुटी संबंधात शासनाचं लक्ष वेधण्यासाठी येत्या १ सप्टेंबरपासून देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला आयएमए व स्त्रीरोग तज्ञांच्या संघटनांनी पाठींबा दिल्याची माहिती संघटनेचे डॉ राजेश फडकुले व वैभव मेरू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोनेग्राफी विषयक कामकाज यामुळं पूर्णत: बंद राहणार आहे. यावेळी बोलताना डॉ़ फडकुले म्हणाले की, आमचा कायद्याला विरोध नाही तर या कायद्यात जे तांत्रिक मुद्दे आहेत ते वगळावेत, फॉर्म भरण्यातील चुकी संबंधात डॉक्टरांना जबाबदार धरणं अयोग्य असल्याचं संघटनेचे म्हणणं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटर्स आहेत त्या पूर्णपणे बंद राहतील असेही सांगितले़ या पत्रकार परिषदेस डॉ़ ज्योती तागडिया, नसीम कोल्हारकर, सीमा कासेगांवकर, रूचा शहा उपस्थित आदी उपस्थित होते.