राज्यभरातील रेडिओलॉजिस्ट संप मागे घेणार
By admin | Published: June 21, 2016 05:42 PM2016-06-21T17:42:36+5:302016-06-21T18:24:17+5:30
राज्यभरातील रेडिओलॉजिस्टनी पुकारलेला संप मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांनतर मागे घेण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर काम न करणाऱ्या रेडिओलॉजिस्टवर होत
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - राज्यभरातील रेडिओलॉजिस्टनी पुकारलेला संप मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांनतर मागे घेण्यात येणार आहे.
कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर काम न करणाऱ्या रेडिओलॉजिस्टवर होत असलेल्या कारवाईविरुद्ध राज्यातील रेडिओलॉजिस्ट असोसिएशनने संपाचे हत्यार उपसले अाहे. यावर तोडगा काढण्यासाठी रेडिओलॉजिस्ट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यांत 15 मिनिटांची चर्चा झाली. यावेळी यासंदर्भात समिती नेमण्याचे आश्वासनानंतर मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर रेडिओलॉजिस्टनी संप उद्या मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील बहुतांश रेडिओलॉजिस्ट हे कायदेशीर पद्धतीने काम करत आहेत. पण, काहीवेळा एफ फॉर्म भरताना एखाद दुसरा रकाना राहतो, काहीवेळा रुग्ण चुकीची माहिती देतात, ती माहिती भरली गेल्यास रेडिओलॉजिस्टवर कारवाईचा बडगा उचलला जातो. अनेकदा सबळ पुरावे हातात नसतानाही मशीन सील केले जाते. त्यामुळे रेडिओलॉजिस्टचे नुकसान होते. तीन तीन महिने मशीन बंद राहिल्यास आर्थिक संकट या रेडिओलॉजिस्टवर येते. त्यामुळे अशापद्धतीने होणारी कारवाई थांबावी या प्रमुख मागणीसाठी संप पुकारण्यात आला होता.