शीनाच्या हत्याप्रकरणी राहुलची पुन्हा चौकशी

By admin | Published: August 27, 2015 01:22 PM2015-08-27T13:22:03+5:302015-08-27T14:20:13+5:30

शीना बोहरा हत्याप्रकरणी पीटर मुखर्जींचा मुलगा राहुल याची पोलिसांनी आज पुन्हा चौकशी केली.

Rahul again questioned in the murder case | शीनाच्या हत्याप्रकरणी राहुलची पुन्हा चौकशी

शीनाच्या हत्याप्रकरणी राहुलची पुन्हा चौकशी

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २७ - शीना बोहरा हत्याप्रकरणी पीटर मुखर्जींचा मुलगा राहुल याची मुंबई पोलिसांनी आज पुन्हा चौकशी केली. काल रात्रीच पोलिसांनी राहुलची चौकशी केली होती, मात्र आज सकापासून पुन्हा राहुलची खार पोलिस स्थानकात चौकशी सुरू आहे. शीनाच्या हत्येच्या काही काळ आधीपासून शीना व राहुलमध्ये प्रेमसंबंध होते, त्यामुळेच पोलिस राहुलची कसून चौकशी करत आहेत.
यावेळी राहुलचा जबाब नोंदवण्यात आला. ज्या दिवशी शीनाची हत्या झाली त्यावेळी मीच तिला बांद्रा येथे सोडले, त्यानंतर ती इंद्राणीला भेटली, असे राहुलने आपल्या जबाबात म्हटले आहे. पण त्या दिवसांनंतर शीना गायब झाल्यावर पोलिसांत तक्रार का नोंदवली नाही, असा सवाल त्याला विचारला असता मी इंद्राणीकडे शीनाबाबत चौकशी केली होती. मात्र ती अमेरिकेत गेल्याचे इंद्राणीने त्यावेळेस सांगितले होते, असे तो म्हणाला. मी त्यानंतर अनेक वेळा शीनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा फोन बंद होता. एक दिवस अचानक तिने मला मेसेज करून आपण हे 'रिलेशन' संपवत असल्याचे म्हटले, असेही राहुलने सांगितले. मी तिला पुन्हा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा फोन तेव्हाही बंदच होता, असेही त्याने आपल्या जबाबात म्हटले आहे. त्येच्या काही काळ आधीपासून शीना व राहुलमध्ये प्रेमसंबंध होते, मात्र ही बाब इंद्राणी व पीटर या दोघांना खटकत होती. त्यामुळे हा 'ऑनर किलींग'चा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून ते त्या दृष्टिकोनातून तपास करत आहेत. 
दरम्यान याप्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारियाही खार पोलिस स्थानकात दाखल झाले असून ते इंद्राणी, तिचा दुसरा पती संजीव व ड्रायव्हर या तिघांचीही समोरासमोर चौकशी करणार असल्याचे समजते. 

 

Web Title: Rahul again questioned in the murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.