राहुल बजाज यांचा हृद्य सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:19 AM2017-08-02T04:19:25+5:302017-08-02T04:19:27+5:30
ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचा मित्रपरिवारातर्फे हृद्य सत्कार करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री आणि राष्टÑवादी कॉँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
पुणे : ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचा मित्रपरिवारातर्फे हृद्य सत्कार करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री आणि राष्टÑवादी कॉँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. पुण्यातील जे. डब्ल्यू. मॅरिएट या पंचतारांकित हॉटेलमध्ये रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम रंगला. या वेळी शरद पवार, प्रतिभा पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, सिम्बायोसिस विद्यापीठाचे संस्थापक- अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया आणि त्यांच्या पत्नी इंदिरा, अरुण फिरोदिया आणि त्यांच्या पत्नी जयश्री, शेखर बजाज, मधुर बजाज, संजीव बजाज, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, विठ्ठल मणियार, ईश्वरदास चोरडिया, अतुल चोरडिया, दीपक संघवी, विजय शिर्के, अविनाश भोसले, गौरी भोसले, खासदार सुप्रिया सुळे, अनिरुद्ध देशपांडे, विद्या येरवडेकर यांच्यासह देशातील विविध क्षेत्रांतील नवडक मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, ‘‘राहुल यांचे चुलते रामकृष्ण बजाज यांच्या माध्यमातून त्यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर गेल्या पन्नास वर्षांत ऋणानुबंध वाढत गेला.’’ प्रफुल्ल पटेल यांनी राहुल बजाज यांच्या खासदारकीचा किस्सा सांगितला. २००६ मध्ये आपण कुटुंबीयांसमवेत परदेशात सुटीसाठी गेलो होतो. या वेळी राज्यसभेची निवडणूक होणार होती.
शरद पवार यांनी राहुल बजाज ही निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना राष्टÑवादीसह इतर पक्षांनीही पाठिंबा दिला आणि त्यांची राज्यसभेतील संस्मरणीय कारकीर्द सुरू झाली. डॉ. मुजुमदार यांनीही आठवणींना उजाळा दिला.
राहुल बजाज यांना सिम्बायोसिस आंतरराष्टÑीय विद्यापीठातर्फे डी. लिट. पदवी प्रदान केली जाणार असल्याची घोषणा डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी केली.