राहुल गांधी पक्षातील ‘अडथळे’ दूर करणार!
By admin | Published: May 18, 2014 12:18 AM2014-05-18T00:18:35+5:302014-05-18T00:18:35+5:30
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आता मनासारखे काम करता येईल, अशी भावना त्यांच्यासोबत काम करणारे विश्वासू सहकारी व्यक्त करीत आहेत.
Next
गजानन जानभोर - नवी दिल्ली
नरेंद्र मोदी यांच्या जबरदस्त फटक्यामुळे देशभरात काँग्रेसचा सुपडासाफ झाला ही वस्तुस्थिती असली तरी या दारुण पराभवातून खूप काही शिकत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आता मनासारखे काम करता येईल, अशी भावना त्यांच्यासोबत काम करणारे विश्वासू सहकारी व्यक्त करीत आहेत. आपल्या कामात वारंवार अडथळे निर्माण करणा:या काही नेत्यांना नजिकच्या काळात बाजुला करण्याच्या निर्णयाप्रत ते आले असल्याची माहितीही या सूत्रंनी दिली.
काँग्रेसच्या पराभवाची राहूल गांधी यांना जाणीव होती, असा धक्कादायक दावा त्यांच्यासोबत काम करणा:या एका सहका:याने केला. राहूल गांधी यांना ही जाणीव होती तर त्यांनी पक्षाला वेळीच सावरले का नाही? असा प्रश्न विचारला असता, त्यांच्या मनासारख्या सर्वच गोष्टी होत नसतात, असे हा सहकारी म्हणाला. पक्षाच्या बैठकीत राहूल गांधी यांनी अनेकदा आक्रमक भूमिका मांडली परंतु काही नेत्यांच्या विरोधामुळे त्यांना शांत राहावे लागायचे, अशी माहितीही त्याने दिली. शुक्रवारी राहूल गांधी यांनी सहका:यांसोबत चिंतन केले.
इतना सन्नाटा क्यो है भाई
च्मागील चाळीस वर्षाच्या काळात काँग्रेससाठी आजचा दिवस भयंकर दु:खाचा ठरला. सोनिया गांधी यांचे निवासस्थान, काँग्रेसचे मुख्यालय आणि राहूल गांधी यांचे निवासस्थान असलेल्या 12 तुघलक लेन येथे सन्नाटा पसरला होता.
च्काँग्रेसला पुन्हा नव्या जोमाने उभे करु असा विश्वास त्यांनी या चर्चेत व्यक्त केल्याची माहिती आहे. काँग्रेसची पुनर्बाधणी करण्याचे प्रय} मागील तीन वर्षापासून राहूल गांधी करीत आहेत. मात्र त्यात काही समस्या येत होत्या.
च्काही नेत्यांच्या अहंकारामुळे या प्रयत्नांमध्ये सातत्याने अडथळे येत आहेत. सत्तेत असल्यामुळे अनेक मर्यादा यायच्या. परंतु आता त्यांना मनाजोगते काम करता येईल, असे वक्तव्य या सहका:याने केले.