Supreme Court: राहुल शेवाळे तातडीने दिल्लीला, सोबत वकीलही; सत्तासंघर्षाच्या निकालाची अवघ्या राज्याला उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 05:02 PM2023-05-10T17:02:45+5:302023-05-10T17:04:16+5:30
Uddhav Thackeray vs Eknath Shinde: अवघ्या महाराष्ट्राला एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या सत्तासंघर्षावर काय होईल याची गेल्या १० महिन्यांपासून उत्सुकता लागून राहिली आहे.
अखेर राज्याच्या सत्तासंघर्षावरील निकालाचा तो दिवस उजाडणार आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी उद्याची सकाळ खूप गर्दीची असल्याचे म्हटले आहे. आजचा समलिंगी विवाह प्रकरणातील युक्तिवाद थांबविताना चंद्रचूड यांनी उद्या दोन निकाल द्यायचे आहेत, त्यामुळे पुढील सुनावणी ही उद्या दुपारी १२ नंतर होईल असे सांगितले आहे. राहुल शेवाळे दिल्लीला निघाले आहेत.
सर्वोच्च न्यायालय सत्तासंघर्षाचा चेंडू दुसरीकडे भिरकावण्याची शक्यता; उज्ज्वल निकमांचे स्पष्ट मत
दरम्यान, अवघ्या महाराष्ट्राला एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या सत्तासंघर्षावर काय होईल याची गेल्या १० महिन्यांपासून उत्सुकता लागून राहिली आहे. डॉ.अभिषेक मनु सिंघवी यांना चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आणि हे दोन निकाल कोणते याची चर्चा सुरु झाली होती. उद्या आम्ही दोन खंडपीठांचे निकाल सांगणार आहोत, असे ते म्हणाले.
पहिला निकाल हा राज्यातील सत्तासंघर्षाचा असेल तर दुसरा निकाल हा दिल्ली सरकार विरुद्ध एलजी प्रकरणाचा असणार आहे. 18 जानेवारी रोजी घटनापीठाने हा निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, राज्यात घडामोडींना सुरुवात झाली असून उद्याच्या निकालाची कुणकूण लागताच शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. सोबत वकील देखील असल्याने निकाल काय लागणार यावरून चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, आज युवासेनेचे आदित्य ठाकरे देखील ठाकरे गटाच्या नेत्यांसोबत राजभवनावर दाखल झाले होते. ते सत्तासंघर्षासाठी नाही तर रस्ता कंत्राटात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाने राज्यपालांची भेट घेतली आहे.
आज लोकमतला ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मुलाखती देऊन लोकांना पडलेल्या प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे दिली आहेत. या लिंक खालीलप्रमाणे....
१६ आमदार अपात्र ठरले तर कोणालाच बहुमत नाही; बापटांनी सांगितला 'त्यांच्या' मनातला निकाल
...तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतील; उल्हास बापटांचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी महत्वाचे विधान
१६ आमदार अपात्र झाले तर उरलेल्या २४ जणांचे काय? उल्हास बापटांनी 'कायद्याचे राजकारण' सांगितले...