आंतरराष्ट्रीय संकुल बनविणार : राहुल कुल

By Admin | Published: November 3, 2016 01:32 AM2016-11-03T01:32:31+5:302016-11-03T01:32:31+5:30

माझ्या राजकीय वाटचालीत कुस्तीचा वाटा मोलाचा आहे. या परिसरातून आंतरराष्ट्रीय मल्ल तयार होतील असे संकुल बनविण्यात येईल

Rahul will be constructing an international complex: Rahul | आंतरराष्ट्रीय संकुल बनविणार : राहुल कुल

आंतरराष्ट्रीय संकुल बनविणार : राहुल कुल

googlenewsNext


केडगाव : माझ्या राजकीय वाटचालीत कुस्तीचा वाटा मोलाचा आहे. या परिसरातून आंतरराष्ट्रीय मल्ल तयार होतील असे संकुल बनविण्यात येईल, असे आश्वासन आमदार राहुल कुल यांनी दिले.
कुल यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पारगाव येथे तालुकास्तरीय कुस्ती निवड चाचणी झाली, त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगी कुस्ती केंद्राच्या वसतिगृह, कुस्ती मॅट व जिमचे पूजन झाले. प्रमुख पाहुणे पंढरीनाथ पठारे यांनी या कुस्ती संकुलासाठी २ लाख रुपये मदत जाहीर केली.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे, उद्योजक उत्तम फडतरे, पैलवान काका पवार, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, निळकंठ शितोळे, माऊली ताकवणे, राजकुमार मोटे, विकास शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर सरपंच सोपान जाधव, उपसरपंच संभाजी ताकवणे, पोपटराव ताकवणे, राजकुमार मोटे, सर्जेराव जेधे, राजेंद्र कोंडे,
तुकाराम ताकवणे, आबासाहेब खळदकर, सुरेश ताकवणे, रवी बोत्रे, रमेश बोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
खोर येथे शशांक फाउंडेशनच्या वतीने आमदार कुल यांच्या हस्ते २५० झाडे लावण्यात आली. पिंपळगाव व वासुंदे येथे तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
माजी आमदार रंजना कुल व कांचन कुल यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
या वेळी कुल यांच्या २०० कार्यकर्त्यांनी नेत्रदानाचा अर्ज भरून नेत्रदानाचा संकल्प केला. (वार्ताहर)

Web Title: Rahul will be constructing an international complex: Rahul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.