राहुरी विद्यापीठ ठरला राज्यस्तरीय कुलगुरू टी-२० चषक विजेता, मुंबई विद्यापीठ तिसऱ्या स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 07:32 PM2019-01-13T19:32:32+5:302019-01-13T19:33:06+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात राज्यस्तरीय कुलगुरू टी-२० चषक क्रिके ट स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. यात राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ संघ विजेता, तर नागपूर येथील मत्स्य व पशू विज्ञान विद्यापीठ (माफसू) उपविजेता ठरला.
अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात राज्यस्तरीय कुलगुरू टी-२० चषक क्रिके ट स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. यात राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ संघ विजेता, तर नागपूर येथील मत्स्य व पशू विज्ञान विद्यापीठ (माफसू) उपविजेता ठरला. मुंबई विद्यापीठ संघाला तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले. अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यस्तरीय आंतर कुलगुरू चषक टी-२० स्पर्धेला अमरावती विद्यापीठात ६ जानेवारीपासून प्रारंभ झाला. यात राज्यातून १५ विद्यापीठ संघाने सहभाग नोंदविला होता. रविवारी अंतिम सामना नागपूरच्या माफसू आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्यात खेळला गेला. नाणेफेक जिंकून राहुरी विद्यापीठ संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २० षटकांत २१३ धावांचा डोंगर उभा केला. विकास धनवटे याने ५८, तर सतपाल गायकवाड ९६ यांनी सर्वाधिक धावला काढल्या. त्यानंतर नागपूर माफसूने २१३ धावांचे आव्हान स्वीकारत फलंदाजीस प्रारंभ केला. पहिल्या फळीतील खेळाडूंनी चांगली सुरूवात केली. मात्र, नागपूर माफसू संघ मैदानावर फार टिकाव धरू शकला नाही. अखेर १९.३ षटकांतच सर्व गडी तंबूत पाठवून १२३ धावांवरच नागपूर माफसू संघाला राहुरी संघाने रोखले. अंतिम सामन्यात राहुरी विजेता तर उपविजेता म्हणून नागपूर माफसू संघ ठरला. तिसºया स्थानासाठी मुंबई विद्यापीठ विरूद्ध अकोला कृषी विद्यापीठ संघात खेळला गेला. यात मुंबई संघ विजयी ठरला.
परिणामी मुंबई विद्यापीठ संघ तिस-या क्रमांकावर असल्याचे आयोजकांनी जाहीर केले. त्यानंतर अमरावती विद्यापीठाच्या स्व.के.जी. देशमुख सभागृहात बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख, शारीरिक शिक्षण विभागाचे अविनाश असनारे, विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय देशमुख, सरचिटणीस विलास सातपुते, निलेश वंदे, संजय ढाकुलकर, प्रेम मंडपे, विठ्ठल मरापे, मनीष शास्त्री आदी उपस्थित होते.