रायगड जिल्ह्यात म्हसळा येथे सर्वाधिक 151 मिमी पावसाची नोंद
By admin | Published: June 24, 2016 02:11 PM2016-06-24T14:11:35+5:302016-06-24T14:11:54+5:30
शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोविस तासात रायगड जिल्ह्यात म्हसळा येथे जिल्ह्यातील सर्वाधिक 151 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Next
>जयंत धुळप /दि.24(अलिबाग)
रायगड, दि. २४ - शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोविस तासात रायगड जिल्ह्यात म्हसळा येथे जिल्ह्यातील सर्वाधिक 151 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच चोविस तासात जिल्ह्यात एकुण 1003.46 मिमी पाऊस झाला असून हे सरासरी पर्जन्यमान 62.71 मिमी आहे. गतवर्षी याच दिवशी हा एकुण पाऊस 1865.40 मिमी होता व त्यावेळी सरासरी पर्जन्यमान 116.59 मिमी होते. यंदाचा पाऊस गतवर्षीच्या सरासरी प्रमाणास अद्याप पोहोचू शकलेला नाही.
दरम्यान शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चाेविस तासात रायगड जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी श्रीवर्धन-150, तळा-94, मुरुड-87, रोहा-85, माणगांव-73, महाड-72, पोलादपुर-55, उरण-53,सुधागड-49, अलिबाग-46,पनवेल-43,
माथेरान-17, खालापूर-12, पेण-07, कर्जत-9.20 मिमी पावसाची नोंद झाली आहे.