रायगड किल्ला रात्रीही विजेमुळे होणार प्रकाशमान- डॉ. नितीन राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 09:23 AM2022-03-22T09:23:18+5:302022-03-22T09:23:33+5:30

राज्यभरात सोमवारी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात असताना राऊत यांनी दिलेली माहिती म्हणजे शिवजयंतीनिमित्त राज्याला एक अनोखी भेट मानली जात आहे.

Raigad fort will be illuminated even at night due to electricity | रायगड किल्ला रात्रीही विजेमुळे होणार प्रकाशमान- डॉ. नितीन राऊत

रायगड किल्ला रात्रीही विजेमुळे होणार प्रकाशमान- डॉ. नितीन राऊत

Next

मुंबई :  शिवछत्रपतींची राजधानी असलेल्या रायगड  किल्ल्यावरील जुन्या व जीर्ण विद्युत वाहिन्या बदलून वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण करण्याचे अतिशय अवघड कार्य महावितरणच्या माध्यमातून राज्य सरकारने पार पाडले असून यामुळे रायगड किल्ला रात्रीही प्रकाशमान होणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली.

राज्यभरात सोमवारी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात असताना राऊत यांनी दिलेली माहिती म्हणजे शिवजयंतीनिमित्त राज्याला एक अनोखी भेट मानली जात आहे. रायगड जिल्हा नियोजन समितीमार्फत ६.०४ कोटींचा निधी या कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. या कामाचा कार्यादेश ५ मार्च २०२० रोजी देण्यात आला होता. 

भूमिगत वाहिन्या
रायगडावर सुरक्षित आडोशाच्या ठिकाणी ४ वितरण रोहित्रे बसविण्यात आली असून भूमिगत वीज वाहिन्यांमार्फत वीज वितरण करण्यात येत असल्याने याचा रायगडाच्या सौंदर्यांवर कोणतीही  परिणाम होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे. कोकणातील व प्रामुख्याने गडावर कोसळणारा मुसळधार पाऊस व वारे यामुळे सुरक्षितता व टिकाऊपणाच्या दृष्टीने विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात आल्या आहेत.

Web Title: Raigad fort will be illuminated even at night due to electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.