रायगड औद्योगिक क्रांतीचा पहिला जिल्हा बनेल
By admin | Published: February 16, 2017 04:49 AM2017-02-16T04:49:07+5:302017-02-16T04:49:07+5:30
रायगड जिल्हा हा महाराष्ट्रात औद्योगिक क्रांतीचा पहिल्या क्र मांकाचा जिल्हा बनणार आहे, कारण याच ठिकाणी नवी मुंबई एअरपोर्ट
पनवेल : रायगड जिल्हा हा महाराष्ट्रात औद्योगिक क्रांतीचा पहिल्या क्र मांकाचा जिल्हा बनणार आहे, कारण याच ठिकाणी नवी
मुंबई एअरपोर्टच्या रूपाने एअर कार्गो व जेएनपीटी असल्याने हे नक्कीच शक्य होणार आहे. मुंबई विमानतळाची क्षमता संपली
आहे, यामुळे पर्यटक देखील याठिकाणी कमी प्रमाणात येत
आहेत. अनेक एअर लाइन्स याठिकाणी आपली सेवा पुरवण्यास इच्छुक आहेत. मात्र अपुऱ्या जागेअभावी हे शक्य होत नाही. नवी मुंबई विमानतळ व एअर कार्गो सुरू होणार असल्याने पर्यटनाला देखील नक्कीच चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
रायगड जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ उलवे येथे आयोजित
जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. आपण ज्या प्रकारे एखादी चांगली बँक बघून आपले पैसे जमा
करतो, यासारखेच राजकीय पक्षाचे देखील आहे. तुमच्यासमोर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यासारख्या मतदानाच्या बँकांचा
पर्याय आहे. मात्र यापैकी आमची भाजपा बँकच सर्वोत्कृष्ट आहे.
जी तुमच्या मतांच्या रूपात ठेवलेल्या डिपॉझिटवर योग्य रूपाने तुम्हाला
पाच वर्षांनी परत करू. आमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकांचा
पर्याय निवडल्यास त्या बँकांची अवस्था पेण अर्बन बँकेसारखी
होईल, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. रायगड जिल्ह्यात भाजपा पंचायत समितीच्या ८२ आणि जिल्हा परिषदेच्या ४१ जागांवर निवडणूक लढत आहे. राज्यात भाजपाचे सरकार आहे त्याच प्रकारे तळागाळात पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या जागेवर देखील भाजपाचे कमळ फुलविण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे नैना क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्याची
आणि प्रकल्पग्रस्तांच्या लीज होल्ड जमिनी फ्री होल्ड करण्याची, तसेच एसईझेड रद्द करून दुसरे उद्योग याठिकाणी आणून स्थानिकांना त्यामध्ये सामावून घेण्याची मागणी केली. या जाहीर सभेला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, रायगड जिल्हा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जगदीश गायकवाड आदींसह गव्हाण जिल्हा परिषद गटाचे उमेदवार हेमंत ठाकूर, पंचायत समिती गण उमेदवार रत्नप्रभा घरत आदींसह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उलवा येथे उपस्थित होते. (प्रतिनिधी)