रायगड जिल्ह्यात 4 लाख 87 हजार 798 रोपांची लागवड

By Admin | Published: July 1, 2016 09:00 PM2016-07-01T21:00:32+5:302016-07-01T21:00:32+5:30

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्नी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्तच्या कृषी दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाने आयोजित राज्यातील दोन कोटी वृक्ष लागवडीच्या बुधवारच्या महत्वपूर्ण

Raigarh district has 4 lakh 87 thousand 798 plantations | रायगड जिल्ह्यात 4 लाख 87 हजार 798 रोपांची लागवड

रायगड जिल्ह्यात 4 लाख 87 हजार 798 रोपांची लागवड

googlenewsNext

- जयंत धुळप 

अलिबाग - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्नी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्तच्या कृषी दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाने आयोजित राज्यातील दोन कोटी वृक्ष लागवडीच्या बुधवारच्या महत्वपूर्ण उपक्रमात रायगड जिल्ह्याने तब्बल 4 लाख 87 हजार 798 रोपांची लागवड करुन मोठे योगदान दिले आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांत सर्वाधिक 82 हजार 249 रोपांची लागवड माणगांव तालुक्याने केली असून माणगाव रोप लागवडीत प्रथम ठरला आहे.
उवर्रित तालुक्यांत पेण मध्ये 68 हजार 196, कर्जत मध्ये 41 हजार 826,अलिबाग मध्ये 38 हजार 447, मुरुड मध्ये 37 हजार 522, खालापूर मध्ये 36 हजार 402,रोहा मध्ये 35 हजार, पनवेल मध्ये 27 हजार 900,महाड मध्ये 26 हजार 975, म्हसळा मध्ये 19 हजार 653, श्रीवर्धन मध्ये 17 हजार 710, पोलादपूर मध्ये 17 हजार 135,उरण मध्ये 16 हजार906, सुधागड-पाली मध्ये 15 हजार 317 तर तळा तालुक्यांत 6 हजार 760 रोपांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाच्या सुत्रंनी दिली आहे.

Web Title: Raigarh district has 4 lakh 87 thousand 798 plantations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.