मराठवाड्याचा रेल्वे विकास ‘फास्ट ट्रॅक’वर यावा
By Admin | Published: February 25, 2015 01:38 AM2015-02-25T01:38:26+5:302015-02-25T01:38:26+5:30
यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मराठवाड्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य होतील आणि कासवगतीने होत असलेला मराठवाड्याचा रेल्वे विकास ‘फास्ट ट्रॅक ’वर येईल
औरंगाबाद : यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मराठवाड्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य होतील आणि कासवगतीने होत असलेला मराठवाड्याचा रेल्वे विकास ‘फास्ट ट्रॅक ’वर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दक्षिण मध्य रेल्वेकडून सातत्याने नांदेड विभागाकडे कानाडोळा केल्याने मराठवाड्यातील रेल्वे विकास खुंटला. मराठवाड्याला मुंबईला जोडावे अथवा नांदेड येथे स्वतंत्र झोन करण्याची मागणी काही वर्षांपासून केली जात आहे. यासाठी मराठवाडा विभाग मध्य रेल्वेशी जोडणे आवश्यक वाटत आहे. रेल्वे संघटना, लोकप्रतिनिधींकडून रेल्वे प्रश्नांवर दिल्लीत वेळोवेळी आवाज उठवला. परंतु कायम अन्यायच झाला. परंतु यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पातून मनमाड- मुदखेड दुहेरी रेल्वे मार्ग करणे, पिटलाईनचे काम लवकरात लवकर करणे, रोटेगाव- कोपरगाव या ३५ कि.मी. रेल्वेमार्गाचे काम करावे, औरंगाबाद- दौलताबाद- चाळीसगाव रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण लवकर पूर्ण करणे, विविध रेल्वेगाड्या सुरू करणे इ. मागण्यांसाठी मुबलक निधीची घोषणा पूर्णत्वास नेली जातील, अशी अपेक्षा आहे. नांदेड-औरंगाबाद- बिकानेर, औरंगाबाद-दिल्ली-कटरा, औरंगाबाद-गोवा या गाड्यांची मागणी केली आहे.