रेल्वे अपघात घटले, २0१७ मध्ये दर दिवशी ७ प्रवाशांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2017 02:54 AM2017-04-04T02:54:42+5:302017-04-04T02:54:42+5:30

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी अपघात होत असतानाच, आता त्याचे प्रमाण घटल्याची बाब निदर्शनास आली

Railway accident deaths, 7 passengers die every day in 2017 | रेल्वे अपघात घटले, २0१७ मध्ये दर दिवशी ७ प्रवाशांचा मृत्यू

रेल्वे अपघात घटले, २0१७ मध्ये दर दिवशी ७ प्रवाशांचा मृत्यू

Next

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी अपघात होत असतानाच, आता त्याचे प्रमाण घटल्याची बाब निदर्शनास आली आहे. २0१७ मधील गेल्या तीन महिन्यांत ६६४ जणांचा मृत्यू, तर ८0६ प्रवासी जखमी झाले आहेत. मृत्यूंची संख्या पाहता, दर दिवशी ७ प्रवाशांचा मृत्यू होत असून, २0१६ मध्ये हेच प्रमाण दिवसाला १0 प्रवाशांचा मृत्यू एवढे होते.
मुंबई उपनगरीय मार्गावर होणाऱ्या विविध अपघातांत वर्षाला साडेतीन ते चार हजार प्रवाशांचा मृत्यू होतो, तर जखमी प्रवाशांची संख्याही तेवढी आहे. रेल्वे रूळ ओलांडताना, ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडणे, लोकलमधून पडून, खांबाची धडक लागणे, ओव्हरहेड वायरचा शॉक, याबरोबरच नैसर्गिक मृत्यू होणे अशा अपघातांचा समावेश असतो. मोनिका मोरे या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडल्याने दोन हात गमावले, तर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात डोंबिवलीच्या भावेश नकाते याचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यासह रूळ ओलांडताना होणाऱ्या सर्वाधिक अपघातांचे प्रमाण पाहता, रेल्वे प्रशासनाकडून हे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. दोन स्थानकांमध्ये पादचारी पूल, सरकते जिने, दोन रुळांमध्ये कुंपण, तसेच शॉर्टकट
मार्ग रोखण्यासाठी रुळांजवळील झोपड्यांजवळ संरक्षक भिंत इत्यादी उपाययोजना करण्यात आल्या
आहेत.
तसेच मुंबई उपनगरीय मार्गावरील लोकल फेऱ्या वाढवण्यावरही भर देण्यात आल्यानंतर, त्याचा परिणाम पाहता, गेल्या तीन महिन्यांत अपघातांचे प्रमाण हे घटले. या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत ६६४ जणांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
>गेल्या चार वर्षांतील अपघातांची आकडेवारी
वर्षमृत्यूजखमी
२0१३३,५१३३,५६३
२0१४३,४२९३,२९९
२0१५३,३0५३,३५१
२0१६३,२0८३,४४५

Web Title: Railway accident deaths, 7 passengers die every day in 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.