रेल्वे कर्मचाऱ्यांनी केले सोनूप्रमाणे काम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 05:49 AM2020-06-01T05:49:44+5:302020-06-01T05:50:08+5:30
रेल्वे कर्मचाऱ्यांनी ६८ वर्षीय महिलेचे राजधानीचे तिकीट काढले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून अभिनेता सोनू सूद अडकलेल्या मजुरांना, नागरिकांना आपल्या मूळगावी पाठविण्यासाठी मदत करत आहे. त्याप्रमाणे रेल्वे अधिकारी आणि कर्मचाºयांनी काम केले आहे. वांद्रे टर्मिनसवर एकट्या बसलेल्या ६८ वर्षीय महिलेची विचारपूस रेल्वे कर्मचाºयांनी केली. सर्व माहितीची शहानिशा करून रेल्वे अधिकाºयांनी महिलेचे राजधानी एसी द्वितीय श्रेणीचे तिकीट काढून दिल्लीला पाठविले.
दिल्ली येथे राहणाºया लीलावती नाथ (६८) वांद्रे टर्मिनसवर शनिवारी फिरताना रेल्वे कर्मचाºयांना दिसल्या. त्यानंतर या महिलेची विचारपूस केली असता तिने सांगितले की, तिचा मुलगा मुंबईत राहत आहे. तो आजारी होता. म्हणून दिल्लीतून मुलाची काळजी घेण्यासाठी त्या मुंबईत आल्या. मात्र मुलगा बरा झाल्यावर त्याने घरातून हाकलले. त्यामुळे इथे टर्मिनसवर आहे. त्यानंतर या महिलेला टर्मिनसवरील प्रतीक्षालयात राहण्यासाठी जागा दिली. त्यांना खाण्यासाठी दिले. मुंबई सेंट्रल ते दिल्ली राजधानीने त्यांचा प्रवास होऊ शकतो. त्यामुळे संबंधित रेल्वे अधिकाºयांशी संपर्क साधून त्यांना कारद्वारे वांद्रे टर्मिनस ते मुंबई सेंट्रल सोडले, अशी माहिती वांद्रे स्थानकाचे अधीक्षक सागर कुलकर्णी यांनी दिली.
सोशल मीडियाद्वारे महिला वांद्रे स्थानकावर फिरत असल्याचा व्हिडीओ मिळाला. माझ्या इमारतीत कोरोना रुग्ण आढळून आल्याने आमची इमारत सील केली आहे. मात्र त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने मी संबंधित रेल्वे अधिकाºयांना फोन करून तिकिटाची व्यवस्था केली. त्या महिलेच्या सांगण्यावरून त्यांच्या मुलाकडून त्यांना मारहाण होत होती. त्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात राहायचे की दिल्लीकडील मुलाकडे जायचे आहे, विचारल्यावर त्यांनी दिल्लीला जायचे आहे, असे सांगितले. तसेच दिल्लीला पोहोचल्यावर त्यांच्या राहत्या घरी सोडण्यासाठी दिल्लीतील सामाजिक संघटनेला सांगितले आहे, अशी माहिती वरिष्ठ विभागीय आॅपरेशन व्यवस्थापक सुहानी मिश्रा यांनी दिली.
रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाºयांनी महिलेचे तिकीट काढून त्यांना दिल्ली येथील घरी पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे. यासह त्यांच्या खाण्याची व्यवस्था केली. रेल्वे अधिकाºयांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.