मुंबईतील रेल्वे अपघातांची रेल्वे मंत्र्यांकडून दखल
By admin | Published: December 1, 2015 01:25 AM2015-12-01T01:25:27+5:302015-12-01T01:25:27+5:30
मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात रेल्वेचे विविध अपघात होत आहेत. वर्षाला जवळपास ३,५00 प्रवाशांचा विविध अपघातांत मृत्यू होत असून, हे अपघात कमी
- समिती स्थापन करण्याचे निर्देश
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात रेल्वेचे विविध अपघात होत आहेत. वर्षाला जवळपास ३,५00 प्रवाशांचा विविध अपघातांत मृत्यू होत असून, हे अपघात कमी करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत.
तरीही त्यात रेल्वे प्रशासनाला यश येताना दिसत नाही. नुकताच भावेश नकाते या प्रवाशाचा गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाला. त्यानंतर मुंबईतील रेल्वेच्या जीवघेण्या प्रवासावर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी होऊ लागली.
एकूणच मुंबईतील रेल्वे अपघातांची रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दखल घेतली असून, समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार रेल्वे, राज्य शासनाचे प्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि सामाजिक संस्थांची समिती स्थापन केली जाणार आहे. त्यांना एका महिन्यात अपघात कमी कसे करता येईल यावर सूचना करण्यास सांगण्यात आले आहे.