रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

By admin | Published: July 10, 2015 03:24 AM2015-07-10T03:24:45+5:302015-07-10T03:24:45+5:30

इटारसी येथे काही दिवसांपूर्वी सिग्नल पॅनल यंत्रणेला आग लागली. त्यामुळे मध्य तसेच पश्चिम रेल्वेमार्गावरील मेल-एक्स्प्रेस गाड्यांना

Railway Minister resigns | रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

Next

मुंबई : इटारसी येथे काही दिवसांपूर्वी सिग्नल पॅनल यंत्रणेला आग लागली. त्यामुळे मध्य तसेच पश्चिम रेल्वेमार्गावरील मेल-एक्स्प्रेस गाड्यांना फटका बसत असून, त्या रद्द होतानाच उशिरानेही धावत आहेत.
दोन आठवड्यांपूर्वी लागलेल्या आगीनंतरही ही यंत्रणा सुरळीत न झाल्याने प्रवाशांना मनस्ताप होत असून, त्याची जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी केली आहे.
ही यंत्रणा सुरळीत न झाल्याने यासंदर्भात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांच्याशी भेट घेऊन यंत्रणा सुरळीत करण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Railway Minister resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.