Budget 2018 : राज्यात रेल्वेचे जाळे विस्तारणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 05:08 AM2018-02-02T05:08:03+5:302018-02-02T05:08:48+5:30

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला १ हजार किमीच्या नव्या मार्गिका तसेच १ हजार किमीच्या मार्गांचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेचे जाळे विस्तारणार असून कोट्यवधी प्रवाशांचा प्रवास अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे.

 Railway network to be expanded in the state! | Budget 2018 : राज्यात रेल्वेचे जाळे विस्तारणार!

Budget 2018 : राज्यात रेल्वेचे जाळे विस्तारणार!

Next

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला १ हजार किमीच्या नव्या मार्गिका तसेच १ हजार किमीच्या मार्गांचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेचे जाळे विस्तारणार असून कोट्यवधी प्रवाशांचा प्रवास अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारचा तसा प्रयत्न असून त्यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. नव्या मार्गांसह विद्युतीकरणदेखील करण्यात येणार आहे.

१५ मार्गांवर नवे मार्ग, दुपदरीकरण तसेच ६ विविध भागांमध्ये विद्युतीकरण झपाट्याने करण्याची तरतूद यंदा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच राज्यातील रेल्वेच्या विद्युतीकरणामध्ये मिरज-पंढरपूर १३८ किमी, जसई-उरण १० किमी, पेण-रोहा ६७ किमी, पनवेल-पेण-थळ ७५ किमी, जसई-जेएनपीटी ९ किमी आणि भिगवण-वाशिंबे, गुलबर्गा-अक्कलकोट रोड या मार्गांचा समावेश आहे. दोन्ही मिळून ६० किमीपर्यंत असे एकूण मध्य रेल्वेमार्गावर ३५९ किमीचे विद्युतीकरण करण्यात येणार आहे.

या मार्गांचे दुपदरीकरण
बाबलाड-गुलबर्गा ५.४२ किमी, भालवणी-जेऊर ७.७३ किमी, बोरोटी-दुधनी १३.६६ किमी, दुधनी-कुलाली ९.८३ किमी, गाणगापूर रोड-हुंसीहादगील ६.५८ किमी, जळगाव-भादली ११.५१ किमी, जेऊर-पोफळाज ८.६३ किमी, केम-भालवणी ८.३३ किमी, कुर्डुवाडी-धवळास ९.७२ किमी, पोफळाज-वाशिंबे ९.९७ किमी, पुणे-फुरसुंगी १६.५१ किमी, सावलागी-बाबलाड ७.५८ किमी, वाडसिंगे-कुर्डुवाडी ८.११ किमी, वाशिंबे-पारेवाडी ७.०९ किमी, कल्याण-टिटवाळा १०.८४ किमी अशा पद्धतीने मध्य रेल्वेवरील एकूण १४१.५१ किमीच्या रेल्वेमार्गांचा विस्तार करण्यात येणार आहे.
 

Web Title:  Railway network to be expanded in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.