आज रेल्वे प्रवाशांचे होणार मेगाहाल!

By admin | Published: July 16, 2017 01:13 AM2017-07-16T01:13:57+5:302017-07-16T01:13:57+5:30

उपनगरी रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवार, १६ जुलै रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार

Railway passengers will have mega-hail today | आज रेल्वे प्रवाशांचे होणार मेगाहाल!

आज रेल्वे प्रवाशांचे होणार मेगाहाल!

Next

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवार, १६ जुलै रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाइनवर विक्रोळी ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.
मेन लाइनवर विक्रोळी ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येतील. ब्लॉकदरम्यान विक्रोळी ते दिवा मार्गावरील डाऊन जलद वाहतूक डाऊन धिम्या मार्गावरून चालवण्यात येईल. परिणामी, डाऊन धिम्या मार्गावरील लोकल कांजूरमार्ग, नाहूर, कळवा आणि मुंब्रा या स्थानकांवर थांबणार नाहीत. तर डाऊन आणि अप जलद मार्गावरील लोकलना सकाळी १०.४८ ते दुपारी ४.०२ या वेळेत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी आणि घाटकोपर या स्थानकांवर थांबा देण्यात येईल. यामुळे या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटे उशिराने धावणार आहेत. ब्लॉकदरम्यान मुंबईत धिम्या मार्गावरून येणाऱ्या गाड्या सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

कुर्ला ते वाशी मार्ग बंद
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येतील. ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सकाळी १०.२० ते दुपारी ३.४८ वाजेपर्यंंत कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान बंद राहणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान स्पेशल ट्रेन चालवण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर आणि मेन लाइनने प्रवास करू शकतात.

परेचा जम्बोब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी बोरीवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येतील.
ब्लॉकदरम्यान बोरीवली ते अंधेरी दरम्यानची अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील लोकलची वाहतूक अप आणि डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येईल. तसेच अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत़ राममंदिर स्थानकापवर अप आणि डाऊन मार्गावरील लोकल थांबणार नाहीत.

Web Title: Railway passengers will have mega-hail today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.