रेल्वे पोलिसांनी दिले माकडाच्या पिलांना जीवदान

By admin | Published: June 23, 2016 02:35 PM2016-06-23T14:35:58+5:302016-06-23T14:44:53+5:30

इगतपुरी रेल्वे स्थानकात मनमाडहुन कुर्लाकडे जाणाऱ्या गोदावरी एक्सप्रेसच्या जनरल प्रवासी बोगीत आढळून आलेल्या चार माकडांच्या पिलांना रेल्वे सुरक्षा बल आधिकाऱ्यांनी जीवदान दिले.

Railway police gave life to the parents of the monkeys | रेल्वे पोलिसांनी दिले माकडाच्या पिलांना जीवदान

रेल्वे पोलिसांनी दिले माकडाच्या पिलांना जीवदान

Next

ऑनलाइन लोकमत

इगतपुरी (नाशिक), दि. २३ -  इगतपुरी रेल्वे स्थानकात मनमाडहुन कुर्लाकडे जाणाऱ्या गोदावरी एक्सप्रेसच्या जनरल प्रवासी बोगीत आढळून आलेल्या चार माकडांच्या पिलांना रेल्वे सुरक्षा बल आधिकाऱ्यांनी जीवदान दिले.
मनमाड रेल्वे स्थानकातून कुर्ला टर्मिनस मुंबर्इंकडे जाणारी गोदावरी एक्सप्रेस इगतपुरी रेल्वे स्थानकात प्लाटफॉर्म क्रमांक ३ वर येताच इंजिनपासुन २ नंबरच्या प्रवासी बोगीत शौचालया जवळ गोणीत काही तरी हालचाल होत आहे हे पाहुन प्रवासी घाबरले . तेव्हा रेल्वे गाडी तपासणी करणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक भुपेंद्र सिंह यांनी प्रवासी का भयभीत झालेत म्हणुन पाहिले असता प्रवाशांनी त्यांना ती हलनारी गोणी दाखिवली.
सिंह यांनी सदर घटना रेल्वे सुरक्षा दलाचे निरिक्षक सतीश विधाते यांना दुरध्वनी वरून कळवली असता काही वेळेतच रेल्वे सुरक्षा बल ताफा घटनास्थळी पोहचला व हालणारी गोणी खोलुन पाहिली. तेव्हा त्यात चार माकडाची पिलं त्यात आढळुन आले. सुरक्षा पथकाने हे कुणाचे आहे याची संपुर्ण बोगीत विचारणा केली असता या माकडांचा कोणीच मालक नसल्याने त्यांना रेल्वे सुरक्षा बल कार्यालयात आणुन माकडांच्या पिलांना हरबरे आणि काही अन्नपदार्थ देत पाणी पाजले. उत्तर महाराष्ट्रातुन वन्य प्राण्यांची मुंबईला तस्करी करून मोठे घबाड मिळविण्यासाठी काही टोळ्या कार्यरत आहे का याचाही तपास रेल्वे सुरक्षा बल करणार असल्याची माहिती सतिष विधाते यांनी यावेळी दिली.
याबाबत रेल्वे सुरक्षा बल निरिक्षक सतिष विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली सब इन्स्पेक्टर भुपेंद्र सिंह, सुरक्षा कर्मचारी के. पी. बर्वे, जे. पी. पवार, एम. डि. भटकर, डि. एम. पालवे, उदयराज यादव, दगडु कुभांर, आदिंनी तपास करून बेवारस मुद्देमाल गुन्हा नोंद करु न चारही माकडांचे पिलांना इगतपुरी वनविभागाचे वनक्षेत्रपाल अधिकारी रमेश ढोमसे यांच्या ताब्यात देण्यात आले .
हे माकडांचे पिलं इगतपुरी येथील घाटनदेवी परिसरात वनविभागाच्या निसर्ग संग्राहालयात सोडण्यात आले आसल्याची माहिती वनविभागाने दिली.

Web Title: Railway police gave life to the parents of the monkeys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.