राज्यातील रेल्वेस्थानकांचा होईल शॉपिंग मॉल; ४४ रेल्वेस्थानकांचे रूपडे पालटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 06:48 AM2023-08-06T06:48:47+5:302023-08-06T06:49:06+5:30
आज पंतप्रधानांच्या हस्ते पुनर्विकासाचा प्रारंभ
- संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ५०८ रेल्वेस्थानकांचा कायापालट करण्याच्या योजनेत महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील प्रत्येकी तीन रेल्वेस्थानकांचा समावेश केला आहे. ही सर्व स्थानके अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज होणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पासाठी २४,४७० कोटींचा खर्च येणार आहे.
या स्थानकांचा समावेश
गोधनी, काटोल, नरखेड, औरंगाबाद, किनवट, मुदखेड, अहमदनगर, कोपरगाव, बडनेरा, धामणगाव, परळी वैजनाथ, मलकापूर, शेगाव, बल्लारशाह, चांदा फोर्ट, चंद्रपूर स्थानक, गडचिरोलीचे वडसा (देसाईगंज), गोंदिया, हिंगोली, चाळीसगाव, जालना, परतूर, कोल्हापूर एससीएसएमटी, लातूर स्टेशन, मनमाड, नगरसोल, उस्मानाबाद स्टेशन, गंगाखेड, परभणी जंक्शन, पूर्णा जंक्शन, सेलू, आकुर्डी, दौंड, तळेगाव जंक्शन, कुर्डुवाडी जंक्शन, पंढरपूर, सोलापूर जंक्शन, हिंगणघाट, पुलगाव जंक्शन, सेवाग्राम जंक्शन, वाशिम जंक्शन, परळ, कांजूर मार्ग व विक्रोळी या राज्यातील रेल्वेस्थानकांचा याेजनेत समावेश करण्यात आला आहे.
५०८ रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाचा प्रारंभ रविवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत.