रेल्वे स्थानकांना आता नवे रूप
By admin | Published: February 27, 2017 05:26 AM2017-02-27T05:26:20+5:302017-02-27T05:26:20+5:30
देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करताना, त्यांना नवा लूक देण्याचा निर्णय नुकताच रेल्वे मंत्रालयाने घेतला.
मुंबई : देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करताना, त्यांना नवा लूक देण्याचा निर्णय नुकताच रेल्वे मंत्रालयाने घेतला. यानंतर, फेब्रुवारीत सादर झालेल्या केंद्राच्या अर्थसंकल्पातही स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत असल्याचे सांगून, त्यामध्ये प्रथम देशभरातील २५ स्थानकांचा समावेश करण्यात आला. यात मुंबई उपनगरीय मार्गावरील मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरीवली, एलटीटी आणि ठाणे स्थानकाचा, तर त्याबाहेरील पुणे स्थानक असून, यांच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रियेला मध्य व पश्चिम रेल्वेने सुरुवात केली आहे. मध्य रेल्वेकडून सोमवारी या निविदेचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात केला जाणार आहे.
देशभरातील ए-१ आणि ए श्रेणीतील स्थानके ही सोईसुविधांबाबत उत्तम असली, तरी प्रवाशांची वाढत जाणारी संख्या आणि त्यामुळे अपुऱ्या पडत जाणाऱ्या सुविधा, तसेच नव्या सोईसुविधांची मागणी पाहता, या श्रेणीतील स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अशा जवळपास ए-१ आणि ए श्रेणीतील ३३२ स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास ३८ स्थानके असून, ए-१ श्रेणीतील दहा, तर २८ ए श्रेणीतील स्थानके आहेत. पुनर्विकास करण्यासाठी प्रथम अर्थसंकल्पात देशभरातील २५ स्थानके समाविष्ट करण्यात आली आहेत.
यामध्येही पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरीवली, तर मध्य रेल्वेवरील एलटीटी, ठाणे, पुणे रेल्वेस्थानके आहेत. या प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी रेल्वे मंत्रालयाकडूनही त्वरित आदेश
देण्यात आले आहेत. त्यानुसार, पश्चिम व मध्य रेल्वेकडून निविदा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
>आज शुभारंभ
मध्य रेल्वेने पहिल्या टप्प्यात म्हणून स्थानकांच्या पुनर्विकासासाठी इच्छुक कंपन्यांची पात्रता तपासण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून सोमवारी सीएसटी येथे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक डी.के.शर्मा, मुंबई पालिका आयुक्त अजय मेहता, ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि नगरविकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर आणि प्रमुख विकासक यांच्या हस्ते शुभारंभ केला जाणार आहे.
>पश्चिम रेल्वेवरील स्थानकांचा खर्च
मुंबई सेन्ट्रल विकास २५0 कोटी१६,१७१ चौ.मी.
वांद्रे टर्मिनस (सोईसुविधा)२00 कोटी४२,३६८ चौ.मी.
बोरीवली (सोईसुविधा)२८0 कोटी११,४७५ चौ.मी.
>पश्चिम रेल्वेवरील तीन स्थानकांच्या पुनर्विकासाचा खर्च हा ७३0 कोटी रुपये, तर मध्य रेल्वेवरीलही तीन स्थानकांसाठी प्रत्येकी २00 ते २५0 कोटी रुपये खर्च येईल. विकास करताना फूड कोर्ट,पार्किंग, वैद्यकीय सुविधांसह अनेक सुविधा देण्यात येतील.
>पुनर्विकासातून मिळणाऱ्या सुविधा
स्थानकाच्या इमारतीचा पुनर्विकास करताना आदर्श असे स्थानक निर्माण केले जाईल. स्थानकातील प्रवेशद्वार हे फेरीवाला मुक्त करून मोकळे ठेवले जातील. प्लॅटफॉर्मची लांबी व रुंदी वाढवतानाच पादचारी पुलांचीही रुंदी वाढवण्यावर भरस्वच्छ व आधुनिक असे वॉशरूम, पिण्याच्या पाण्याची सुविधा, इंटनरेट, एटीएम उभारले जाईल. शॉपिंग, हॉस्पिटल, फूड कोर्ट उभारणार, हेलिपॅड, पार्किंग