सावंतवाडीत रेल्वे टर्मिनस

By admin | Published: January 5, 2015 12:51 AM2015-01-05T00:51:12+5:302015-01-05T00:57:33+5:30

सुरेश प्रभू यांची घोषणा : रेल्वेसाठी राज्यात स्वतंत्र महामंडळ

Railway terminus in Sawantwadi | सावंतवाडीत रेल्वे टर्मिनस

सावंतवाडीत रेल्वे टर्मिनस

Next

रत्नागिरी : रेल्वेमंत्री म्हणून कोकणवासीयांच्या सर्व समस्या दूर करण्यास मी कटिबद्ध आहे. सावंतवाडीत रेल्वे टर्मिनस उभारले जाईल. राज्यातील रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य व केंद्राच्या सहभागातून एक स्वतंत्र महामंडळ स्थापन केले जाणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या आठवड्यात तपशीलवार चर्चा होईल व त्याबाबत संयुक्तपणे प्रसारमाध्यमांसमोर घोषणा होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोकण रेल्वेत कोकण कुठे आहे, असे नेहमी विचारले जाते. अनेक समस्या येथे आहेत. प्रवाशांसाठी खूप काही करता येण्याजोगे आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांच्या काळात कोकण रेल्वेबाबतच्या समस्या सुटल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कोकण रेल्वेच्या समस्या सोडविण्याबाबत कॉँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे आज आंदोलन केले. माझा त्यांना सवाल आहे की, गेल्या दहा वर्षांच्या काळात त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली केंद्रात युपीएचे सरकार
होते, त्यावेळी सर्व कामे केली असे म्हणता, मग या समस्या राहिल्या कशा? तुम्हाला तुमचे सरकार असताना समस्या सोडविता आल्या नाहीत, आता मोदींचे सरकार आले आहे. या सर्व समस्या आम्ही सोडविणार आहोत. कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. कोकण रेल्वेचे रखडलेले प्रकल्प सुरू केले जातील.
कोणतेही नवीन लघू प्रकल्प कोकण रेल्वेला स्वतंत्रपणे उभारता यावेत यासाठी तीस कोटींपर्यंतच्या खर्चाचे प्रकल्प कोकण रेल्वे स्वत: मंजूर करू शकेल. तसे अधिकार कोकण रेल्वेला देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. (पान ८ वर)

रेल्वेला दुष्टचक्रातून बाहेर काढणार
दररोज तीन कोटी प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी नेणारी भारतीय रेल्वे ही देशाची मोठी संस्था आहे. मात्र, या ना त्या प्रकारे गेल्या काही वर्षांत रेल्वेवर अत्याचार झाले. आज जेवढे उत्पन्न तेवढाच खर्च अशी रेल्वेची स्थिती असून, नवीन प्रकल्प राबवायचे कसे, प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा द्यायच्या कशा? रेल्वेचे अनेक प्रकल्प केवळ सुरुवात होऊन ठप्प झाले आहेत. त्यामुळेच रेल्वेला या दुष्टचक्रातून बाहेर काढले जाईल व देशवासीयांना रेल्वेच्या अत्याधुनिक सुविधा दिल्या जातील, असे प्रभू यांनी सांगितले.


प्रभू म्हणाले....
‘सेफ्टी आॅडिट ’करु
सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा.
४कोकम सरबतसह कोकणची उत्पादनेही रेल्वे स्थानकांवर.
रेल्वेची सर्व स्थानके स्वच्छ ठेवणार.
अन्य देशांप्रमाणे रेल्वेचे डबे अत्याधुनिक.
रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षाचालकांना ‘टुरिस्ट गाइड’ म्हणून प्रशिक्षित करणार.
प्रवाशांसाठी देशभर ‘हेल्पलाईन’ सुरू
 

Web Title: Railway terminus in Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.