'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 09:05 AM2024-11-06T09:05:38+5:302024-11-06T09:08:52+5:30
Kartiki Wari: पंढरपूर येथे होणाऱ्या होणाऱ्या कार्तिकी यात्रेला भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून तीन विशेष अनारक्षित गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्या ८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान या विविध स्थानकांवरून पंढरपूरकडे जाण्यासाठी चालविण्यात येणार आहेत.
सोलापूर - पंढरपूर येथे होणाऱ्या होणाऱ्या कार्तिकी यात्रेला भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून तीन विशेष अनारक्षित गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्या ८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान या विविध स्थानकांवरून पंढरपूरकडे जाण्यासाठी चालविण्यात येणार आहेत.
यामध्ये लातूर-पंढरपूर-लातूर विशेष ही विशेष ट्रेन दिनांक १२ व १३ नोव्हेंबर रोजी लातूर स्थानकावरून सकाळी ७:३० वाजता सुटेल आणि पंढरपूर रेल्वे स्थानकावर दुपारी १२:५० वाजता पोहोचेल. पंढरपूर-लातूर ही विशेष ट्रेन दिनांक १२ व १३ नोव्हेंबर रोजी पंढरपूर स्थानकावरून दुपारी १:५० वाजता सुटेल आणि लातूर रेल्वे स्थानकावर सायंकाळी ७:२० वाजता पोहोचणार असल्याची माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली.
लातूर, मिरजहूनही रेल्वे
मिरज-कुईवाडी ही ट्रेन दि. १० ते १४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत मिरज स्थानकावरून दुपारी ३:१० वाजता सुटणार असून, पंढरपूर स्थानकावर ५:३० वाजता पोहोचणार आहे. पुढे कुईवाडी स्थानकावर सायंकाळी ७ वाजता पोहोचणार आहे. त्यानंतर कुईवाडी स्थानकावरून रात्री ९:२५ वाजता सुटणार असून, पंढरपूर रेल्वेस्थानकावर १०:२५ वाजता पोहोचणार आणि मिरज स्थानकावर मध्यरात्री १ वाजता पोहोचणार आहे.