गणेशाबरोबरच पाऊसही येणार
By admin | Published: September 4, 2016 04:18 AM2016-09-04T04:18:46+5:302016-09-04T04:18:46+5:30
महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीपर्यंत असलेला कमी तीव्रतेचा कमी दाबाचा पट्टा कायम असून त्याचा परिणाम गेल्या २४ तासात कोकण तसेच विदर्भात
पुणे : महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीपर्यंत असलेला कमी तीव्रतेचा कमी दाबाचा पट्टा
कायम असून त्याचा परिणाम गेल्या २४ तासात कोकण तसेच विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला़ सोमवारी कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़
गेल्या २४ तासात विदर्भातील मुलचेरा ७०, गोरेगाव ६०, अहिरी, सालेकसा ४०, ईटापल्ली, गौडपिंपरी, सिरोंचा ३०, बल्लारपूर, भामरागड, चामोर्शी, गोंदिया, सावळी येथे प्रत्येकी २० मिमी पावसाची नोंद झाली़ कोकणातील भिरा, पेण, श्रीवर्धन ३०, काणकोण, खालापूर, म्हसाळा, मुंबई, फोंडा, राजापूर, रोहा, ठाणे, उल्हासनगर येथे प्रत्येकी २० मिमी पाऊस झाला़ मध्य महाराष्ट्रातील इगतपुरी २०, औरंगाबाद, बीड, चाकूर, धारुर, खुलताबाद, रेणापूर येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस झाला़
पुढील तीन दिवस कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ पुणे शहर व परिसरात रविवारी काही भागात हलक्या स्वरुपाचा रिमझिप पाऊस पडण्याची शक्यता आहे़
मुंबई व उपनगरात पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता असून सोमवारी काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़