कमी दाबामुळे पावसाची विश्रांती
By admin | Published: July 15, 2016 12:41 AM2016-07-15T00:41:26+5:302016-07-15T00:41:26+5:30
कमी दाबाचा पट्टा विरून गेल्याने राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे़ त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही़ अरुणाचल प्रदेश
पुणे : कमी दाबाचा पट्टा विरून गेल्याने राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे़ त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही़ अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, हिमालयाच्या रांगा, बिहार, पूर्व उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़
राज्यात कोकणामध्ये काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़ गेल्या २४ तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला़ राधानगरी ७०, भिरा ६५, महाड ६४, महाबळेश्वर ६२, कोयना २१०, शिरगाव, दावडी, ताम्हिणी ११०, लोणावळा, डुंगरवाडी ७०, वळवण ६०, आंबोणे, कोयना (पोफळी) ५०, खोपोली ४०, शिरोटा, खंद येथे ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.आहे़
कोकणातील कर्जत, खेड ६०, मंडणगड ५०, सांगे ४०, चिपळूण, देवगड, जव्हार, कणकवली, माणगाव म्हसळा, पोलादपूर, रोहा, संगमेश्वर, देवरुख, शहापूर, सुधागडपाली, वैभववाडी येथे प्रत्येकी
३० मिमी पाऊस झाला़ मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा ४०, हरसूल, जावळीमेधा, वेल्हा ३०, आजरा, अक्कलकुवा, चंदगड, इगतपुरी, ओझरखेडा, पन्हाळा, पाटण, पौड मुळशी, पेठ येथे प्रत्येकी २० मिमी पाऊस झाला़
विदर्भात भामरागड, गडचिरोली, कारंजा, पातूर, सालेकसा येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस झाला़ राज्यात गुरुवारी दिवसभरात काही शहरांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या़ पुणे ०़३, महाबळेश्वर १७, नाशिक २, सांगली ०़२, मुंबई १८, अलिबाग १०, रत्नागिरी २, पणजी ५, डहाणू ०़४, उस्मानाबाद ०़२ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ पुढील दोन दिवसांत कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या शक्यतेचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ पुणे व मुंबई परिसरात पावसाच्या एक-दोन सरी पडण्याची शक्यता आहे़