पुढील चार दिवस पावसाचे; पालघर, पुणे, नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 10:59 AM2022-07-12T10:59:11+5:302022-07-12T10:59:51+5:30

गुरूवारनंतर पावसाचा जोर होणार कमी.

Rain for the next four days Warning of heavy rain in Palghar Pune Nashik district weather department | पुढील चार दिवस पावसाचे; पालघर, पुणे, नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

पुढील चार दिवस पावसाचे; पालघर, पुणे, नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

Next

पुणे : बंगालच्या उपसागरावर ओडिशा किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तसेच अरबी समुद्रावर गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत तयार झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे मध्य भारत, तसेच राज्यात सध्या पावसाचा जोर कायम आहे. या स्थितीमुळे राज्यात येत्या गुरुवारपर्यंत पाऊस असाच बसरत राहणार असून, त्यानंतर पाऊस कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. तर पालघर, पुणे, नाशिक जिल्ह्यांत गुरुवारपर्यंत काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

गेल्या आठवड्यापासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राज्याने जुलैची सरासरी ओलांडली आहे. कोकण, मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली.

हवामानाच्या सध्याच्या स्थितीमुळे राज्यातील कोकणातील रायगडमध्ये मंगळवार व बुधवारी, तसेच गडचिरोली, रत्नागिरी व कोल्हापूरमध्ये मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, तर ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, साताऱ्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

Read in English

Web Title: Rain for the next four days Warning of heavy rain in Palghar Pune Nashik district weather department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.