घरबसल्या मिळते पाऊस...पाणी... अन् रोग व्यवस्थापनाची माहिती
By admin | Published: January 19, 2015 04:02 AM2015-01-19T04:02:26+5:302015-01-19T04:02:26+5:30
या तारखेपासून किमान चार दिवस ढगाळ हवामान... पावसाच्या सरी कोसळतील... या पिकांवर या औषधाची फवारणी करा...
अरुण बारसकर/सोलापूर
या तारखेपासून किमान चार दिवस ढगाळ हवामान... पावसाच्या सरी कोसळतील... या पिकांवर या औषधाची फवारणी करा... या व अन्य कृषीविषयक देशभरातील हवामान बदलाची माहिती शेतकऱ्यांना घरबसल्या मिळतेय कृषी खात्याने विकसित केलेल्या शेतकरी पोर्टलमुळे. राज्यातील विभागानुसार जिल्हा व तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असा एस.एम.एस. पोहोचतोय राज्यातील तब्बल १३ लाख ९२ हजार इतक्या शेतकऱ्यांच्या मोबाइलवर.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय तसा तोट्याचाच ठरत आहे़ याकरिता राज्याच्या कृषी विभागाने महाराष्ट्र कृषी शासन mkisan.gov.in हे मोबाइल पोर्टल विकसित केले आहे. शेतकऱ्यांना पिकांबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्याबरोबरच हवामानाची अचूक माहिती कृषी विभागाकडून एसएमएसच्या माध्यमातून दिली जात आहे़