विदर्भ, खान्देशात जोरधारा! हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडले, गोसी खुर्दमधूनही विसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 09:48 AM2023-09-17T09:48:34+5:302023-09-17T09:48:52+5:30
नागपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर असून पेंच तोतलाडोह व नवेगाव खैरी धरण ओव्हर फ्लो झाले असून, धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
जळगाव/नागपूर : पूर्व विदर्भ आणि खान्देशात पावसाचा जोर वाढला असून नद्यांना पूर आला आहे. धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर तर विदर्भातील गोसी खूर्द, तोतलाडोह, नवेगाव खैरी ही धरणे ओव्हर फ्लो झाली असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
नागपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर असून पेंच तोतलाडोह व नवेगाव खैरी धरण ओव्हर फ्लो झाले असून, धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मध्यम व लघु प्रकल्पातील धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिसरातील ग्रामस्थांना स्थलांतरित केले जात आहे. गडचिरोलीतही पाऊस असून, गोसीखुर्दमधून विसर्ग सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी असून संजय सरोवरचे चार दरवाजे उघडले. अमरावतीमधील तीन तालुक्यांत अतिवृष्टी असून अपर वर्धा १०० टक्के भरले आहे.