Rains Live Updates- विश्रांतीनंतर पावसाचं 'कमबॅक'; रस्ते पाण्याखाली, रेल्वे वाहतूकही रखडली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 07:14 AM2018-06-25T07:14:45+5:302018-06-25T12:11:44+5:30

शहर आणि उपनगरांतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच तिन्ही रेल्वे मार्गांवर लोकल उशिरानं धावत आहे. 

Rain Live Update : Lives in the suburbs including Mumbai, heavy rains, local trains on all three routes | Rains Live Updates- विश्रांतीनंतर पावसाचं 'कमबॅक'; रस्ते पाण्याखाली, रेल्वे वाहतूकही रखडली

Rains Live Updates- विश्रांतीनंतर पावसाचं 'कमबॅक'; रस्ते पाण्याखाली, रेल्वे वाहतूकही रखडली

Next

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस मुंबईसह राज्यभरात पुन्हा सक्रिय झाला आहे. रविवारपासून कोसळत असलेल्या पावसानं मुंबई शहरापेक्षा उपनगरांत आणि ठाणे, पालघर, रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहर आणि उपनगरांतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच तिन्ही रेल्वे मार्गांवर लोकल उशिरानं धावत आहेत. पावसाच्या दमदार सरींमुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. पावसाचा जोर आठवडाभर असाच कायम राहणार असून येत्या २४ तासांत जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  दादर, लोअर परळ, माहिम, वांद्रे भागात पावसाचा जोर चांगलाच आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा, फोर्ट परिसरात पावसाचा जोर असून, अनेक भागांत ट्रॅफिक जामचे चित्रही दिसत आहे. सलग सुरू असलेल्या पावसाने मुंबईतील पवई तलाव भरून वाहू लागला आहे. पश्चिम उपनगरांत दहिसर, बोरिवली, गोरेगाव, मालाड भागातही पावसाचा जोर चांगलाच होता. वडाळा ते कांजूरमार्ग परिसरातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. 

RAIN LIVE UPDATES



मुंबईत कोसळणा-या मुसळधार पावसानं माटुंगा पूर्वेत पाणी तुंबलं.












लोकल रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने



- मुंबई- पहाटे 5.30 वाजेपर्यंत कुलाब्यात 90 मिलीमीटर पावसाची, तर सांताक्रूझमध्ये 195 मिमी पावसाची नोंद 
- वडाळ्यात भिंत कोसळून मोठं नुकसान
- संततधार पावसानं सायन आणि चेंबूरच्या सखल भागात साचलं पाणी


- ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मुसळधार पाऊस
- किंग्ज सर्कल, भायखळा पोलीस स्टेशनबाहेर पाणी साचलं
- सायन ट्रॅकमध्ये तुंबलं पाणी
- हिंदमाता परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
- ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस
- उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्ये मुसळधार
- रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये रात्रभर जोरदार पाऊस


खारघरमध्ये तळोजा कारागृहासमोर असलेल्या तलावात फैयान खान (वय १९), रियान खान (वय १९) आणि अबिद सिद्दिकी (वय ३६) यांचा बुडून मृत्यू झाला.


Web Title: Rain Live Update : Lives in the suburbs including Mumbai, heavy rains, local trains on all three routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.