Rain Live Updates: मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; अनेक भाग जलमय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 06:41 PM2020-08-05T18:41:54+5:302020-08-05T19:28:42+5:30
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल याभागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत
मुंबई – हवामान खात्यानं दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुंबई आणि उपनगर परिसरात प्रचंड मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडली आहेत तर सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. चर्चगेटच्या सारख्या परिसरात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यामुळे याठिकाणी असलेली भलीमोठी वृक्ष कोसळली आहेत.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल याभागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत, अनेक भागात पाणी साचलं आहे, भिवंडीत नागरिकांच्या घरात पाणी घुसलं आहे, मीरा-भाईंदर येथे रस्त्यावर पाणी साचल्याने मुंबई-अहमदाबाद वाहतूक ठप्प झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मुंबईकरांना घराच्या बाहेर न पडण्याचं आवाहन
CM Uddhav Balasaheb Thackeray has asked @mybmc to stay on high alert as heavy rains continue in Mumbai for the 2nd consecutive day. Since @Indiametdept predicts heavy rains will continue till tomorrow, CM has appealed to the citizens to stay home and venture out only if essential
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 5, 2020
जे.जे रुग्णालयात पावसामुळे पाणी साचलं
मुंबईच्या जे.जे रुग्णालात मुसळधार पावसामुळे साचलं पाणी, रुग्णांची गैरसोय #MumbaiRainsLivepic.twitter.com/r63IlFWQfa
— Lokmat (@MiLOKMAT) August 5, 2020
भायखळा येथे झाड कोसळलं
वादळी वाऱ्यामुळे भायखळा येथे मोठं वृक्ष कोलमडून पडले, लाईव्ह दृश्य #MumbaiRainsLivepic.twitter.com/9pIO1IbtLK
— Lokmat (@MiLOKMAT) August 5, 2020
पावसात अडकलेल्यांसाठी तात्पुरती व्यवस्था
अतिवृष्टीमुळे लोकल सेवा व वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर किंवा अन्य ठिकाणी अडकून फोडलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात थांबण्याची व्यवस्था मुंबई महापालिकेने केली आहे, रेल्वे स्टेशन नजीकच्या मनपा शाळांमध्ये करण्यात आली आहे.
मरिनलाईन्स ते चर्नीरोड स्टेशनदरम्यान ओव्हर हेड तारेवर झाडं कोसळल्यानं लागली आग
पश्चिम रेल्वे मरिनलाईन्स ते चर्नीरोड दरम्यान ओव्हर हेड वायरवर झाडं कोसळलं, झाडाला आग लागली मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस@WesternRlypic.twitter.com/7ohQD5R7gW
— Lokmat (@MiLOKMAT) August 5, 2020
उरण परिसरात जेएनपीटीच्या तीन क्युसी क्रेन्स पत्त्यासारख्या कोसळून सुमारे २०० कोटींचे नुकसान: सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही