पाऊस... पाऊस... आणि पाऊस, जनजीवन विस्कळीत : भरतीचा धोका टळला, महापालिकेच्या ३५ हजार कर्मचा-यांची फौज तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 02:18 AM2017-09-21T02:18:54+5:302017-09-21T02:18:57+5:30

गेल्या महिन्यात मुसळधार पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळीत केले. याचे तीव्र पडसाद उमटून, सर्वच स्तरांतून मुंबई महापालिकेवर टीकेची झोड उठली.

Rain ... rain ... and rain, life-threatening disorder: risk of recruitment is avoided; 35 thousand employees of municipal corporation deployed | पाऊस... पाऊस... आणि पाऊस, जनजीवन विस्कळीत : भरतीचा धोका टळला, महापालिकेच्या ३५ हजार कर्मचा-यांची फौज तैनात

पाऊस... पाऊस... आणि पाऊस, जनजीवन विस्कळीत : भरतीचा धोका टळला, महापालिकेच्या ३५ हजार कर्मचा-यांची फौज तैनात

Next

मुंबई : गेल्या महिन्यात मुसळधार पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळीत केले. याचे तीव्र पडसाद उमटून, सर्वच स्तरांतून मुंबई महापालिकेवर टीकेची झोड उठली. त्यामुळे मंगळवारी मुंबईत कोसळणा-या मुसळधार पावसाने भीतीचे वातावरण पसरले. त्यात दुपारी १२ वाजता समुद्राला मोठ्या लाटांची भरती येणार असल्याने पालिकाही धास्तावली. मात्र, सर्वच ३५ हजार कर्मचाºयांसह आयुक्त अजय मेहता, उपायुक्त, सहायक आयुक्त रस्त्यावर उतरले. त्यामुळे २९ आॅगस्टच्या तुलनेत जास्त पाऊस होऊनही मुंबईत जनजीवन सुरळीत होते, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
मंगळवारी संध्याकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू होता. त्यात मुंबईत पुढील ७२ तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यानंतर, महापालिकेनेही अ‍ॅलर्ट जाहीर केला. महापालिकेचे सुमारे ३५ हजार कामगार, कर्मचारी तैनात करण्यात आले होते. आयुक्तही स्वत: अधिकाºयांसोबत पंपिंग स्टेशन व पाणी तुंबलेल्या भागांची पाहणी करीत होते. दुपारी १२.०३ वाजता समुद्रात ४.५४ मीटर उंचीच्या लाटा उसळल्यास, मुंबईत अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता होती. त्यामुळे कर्मचारी व अधिकारीही सतर्क होते.
मोठ्या भरतीच्या जोडीला मुसळधार पाऊस झाल्यास मुंबई तुंबते
पावसाचा जोर ओसरल्याने धोका टळला. त्यानंतर, कर्मचारी, अधिकाºयांनी पावसाच्या पाण्याचा निचरा करणाºया सर्व झाकणांवरील कचरा गोळा करून, पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग मोकळा केला. पावसाच्या पाण्याने तरंगून वर आलेला कचरा शहरात अनेक ठिकाणी साचला असल्याने, सफाई मोहीम आता महापालिकेने हाती घेतली आहे. सलग दोन दिवस कर्मचारी भर पावसात कार्यरत असल्याने मुंबई तुंबली नाही, असा दावा पालिकेने केला आहे.
पावसामुळे नवरात्रौत्सवावर परिणाम
नवरात्रीच्या फॅशन टॅटूमेकिंगची मोठी क्रेझ तरुणाईमध्ये आहे. त्यात कपल्स, दांडिया रास, देवीचा चेहरा किंवा अ‍ॅब्स्ट्रॅक्ट टॅटूला अधिक मागणी आहे. टॅटू काढण्याचे दोन प्रकार असून एक कायमस्वरूपी तर दुसरा तात्पुरता. यंदा टॅटूचे दरही काहीसे वाढले असून २ हजार रुपयांपासून ते अगदी ५० हजारांपर्यंतचा समावेश आहे.
कमी वेळेत पाण्याचा निचरा
२९ आॅगस्ट व १९ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी पाणी साचले होते. या पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप सुरू करण्यात आले. अशा ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी, २९ आॅगस्ट रोजी सरासरी कालावधी हा सुमारे २५ तास होता, तर १९ सप्टेंबर रोजी हाच कालावधी सरासरी ८ ते १० तास इतका होता.असा होता वाºयाचा वेग
२९ आॅगस्ट रोजी वा-याचा सर्वाधिक वेग हा मरिन लाइन्स परिसरात ७०.८ किमी प्रति तास असा नोंदविण्यात आला होता. १९ सप्टेंबरला वा-याचा सर्वाधिक वेग हा महापालिका मुख्यालयावरील स्वयंचलित हवामान केंद्रावर ५४.७ किमी प्रतितास एवढा नोंदविण्यात आला. वाहतूक सुरळीत
२९ आॅगस्टच्या पावसादरम्यान १५ ठिकाणी बेस्ट बसेसच्या मार्गांमध्ये बदल करावा लागला होता, तर मंगळवारी सात ठिकाणी बदल करावे लागले.
>असा होता पाऊस
२९ आॅगस्ट रोजी सांताक्रुझ परिसरात सर्वाधिक पाऊस हा ३०३ मिमी. इतका नोंदविण्यात आला होता. याच दिवशी २४ तासांमध्ये एकूण २३ ठिकाणी २०० मिमीपेक्षा अधिक, २६ ठिकाणी ५० मिमीपेक्षा अधिक, तर ५७ ठिकाणी ४० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला होता. याच दिवशी एका तासातील सर्वाधिक पाऊस, भांडुप मध्ये ९९ मिमी, तर त्या खालोखाल माटुंगा परिसरात ९० मिमी. १९ सप्टेंबर रोजी पाऊस अंधेरी परिसरात सर्वाधिक म्हणजे ३३४ मिमी. पाऊस नोंदविण्यात आला. याच दिवशी २४ तासांमध्ये एकूण २४ ठिकाणी २०० मिमीपेक्षा अधिक; ४८ ठिकाणी ५० मिमीपेक्षा अधिक, तर २७ ठिकाणी ४० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला. एका तासातील सर्वाधिक पाऊस दहिसर मध्ये ९० मिमी., तर त्या खालोखाल बोरीवली परिसरात (प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह) ७४ मिमी. पावसाची नोंद झाली.
> पाणी भरले नाही
२९ आॅगस्ट रोजी पहाटे ४.५२ च्या भरतीच्या लाटांची उंची ३.२९ मीटर होती, तर सायंकाळी ४.४८ वाजताच्या भरतीची लाटांची उंची ही ३.२३ मीटर होती. १९ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी ११.२५ वाजता भरतीच्या लाटांची उंची ४.५० मीटर होती, तर रात्री २३.४६ च्या भरतीची लाटांची उंची ही ४.२५ मीटर होती. २९ आॅगस्ट रोजीच्या अष्टमीची भरती असल्याने, भरती-ओहोटीमधील फरक हा ०.८५ मीटर होता, तर १९ सप्टेंबर रोजी हाच फरक ३.४ मीटर एवढा होता. २९ आॅगस्ट रोजीच्या अष्टमीची भरतीमुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढली असल्याने, फ्लड गेट (झडप) अधिक काळ बंद होते, त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अधिक वेळ लागला.
९५% कर्मचा-यांची हजेरी
पालिकेत फक्त पाच टक्के कर्मचारी गैरहजर होते. कर्मचाºयांची चांगली उपस्थिती मुख्यालयासहित सर्व २४ विभाग कार्यालयांत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. पावसाचे पाणी साचून नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून पालिकेचे सुमारे ३५ हजार कर्मचारी दिवस-रात्र कार्यरत आहेत. वांद्रे येथे अनेक गाड्या रस्त्यात नादुरुस्त झाल्यामुळे झालेल्या वाहतूककोंडीने नॅशनल कॉलेजजवळील रस्ता सोडून मुंबईतील सर्व रस्त्यांवर वाहतूक सुरळीत होती, असे सुधीर नाईक यांनी सांगितले.
चार तलाव भरून वाहिले
मुंबईला पाणीपुरवठा करणाºया धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने सर्व धरणांमध्ये १४ लाख २८ हजार दशलक्ष लीटर एवढा पाण्याचा साठा जमा झाला आहे. तानसा तलाव, मोडकसागर, तुळसी तसेच विहार हे चार तलाव भरून वाहू लागले आहेत. भातसा धरणही काठोकाठ भरले आहे तर अपर वैतरणा आणि मध्य वैतरणा धरण जवळपास भरले आहे.
मोडकसागर (१३५ मि.मी), तानसा (८३ मि.मी), विहार (२०० मि.मीश), तुळसी (२४८ मि.मी),अप्पर वैतरणा (११० मि.मी), भातसा (९५ मि.मी), मध्य वैतरणा (९० मि.मी) एवढ्या पावसाची नोंद मंगळवारी ते बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत या एका दिवसात झाली.
पावसामुळे रुग्ण रोडावले
दोन दिवस सातत्याने होणा-या पावसाचा परिणाम पालिका रुग्णालयांतील रुग्णसेवेवर झाला. बुधवारी पालिका रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागातील रुग्ण संख्या रोडावल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालय डॉ.अविनाश सुपे यांनी दिली. मात्र, बुधवारी पाऊस थांबत - थांबत पडल्याने रुग्णालयांत पाणी भरले नाही, परंतु नेहमीच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी झाल्याचे डॉ. सुपे यांनी सांगितले.
झोडपधारेने चौपाट्या सुन्यासुन्या!
मुंबई : संततधारेने जोर धरल्याने मुंबईकरांनी भीतीपोटी घरीच बसणे पसंत केल्याचे चित्र दिसले. त्यामुळे एरव्ही वाहतूककोंडीने त्रस्त असलेले शहरातील रस्ते आणि चौपाट्या सुन्यासुन्या दिसत होत्या. उंच लाटांच्या धोक्याची सूचना दिली होती. त्यामुळे मोकळे रस्ते असतानाही, मुंबईकरांनी चौपाट्यांवर येणे टाळणे.
पूर्व उपनगरांत मुसळधार
मुंबई : सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे, मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर, चेंबूर आणि कुर्ल्याच्या काही सखल भागांत पाणी साचले होते. त्यामुळे बस, रिक्षा आणि रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पालिकेने उपसा पंपांच्या सहाय्याने साठलेले पाणी नाल्यांमध्ये सोडण्याचे काम बुधवारी सकाळपासून हाती घेतले़
पश्चिम उपनगरही धुव्वाधार
पश्चिम उपनगरात मंगळवारपासून मुसळधार पावसाने सुरुवात केली होती. पश्चिम उपनगरासह पूर्व उपनगरातून शहरात दाखल होणाºया पावसाने सर्वप्रथम बोरीवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी, साकीनाका इत्यादी परिसराला झोडपून काढले. पश्चिम उपनगरात काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. परंतु जनजीवन सुरळीत होते. लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या.
सुट्टी दिवाळीत भरून काढणार
पाऊस न थांबल्याने सरकारने मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे बुधवारी संततधारेमध्ये विद्यार्थ्यांचे हाल झाले नाहीत. पण आजचा दिवस दिवाळीच्या सुट्टीत भरून काढण्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची दिवाळीची सुट्टी एका दिवसाने कमी होणार आहे.
पावसामुळे कार्यालये ओस
मुंबई : पावसामुळे सरकारी, निमसरकारी व खासगी कार्यालयांतील बहुतांश अधिकारी, कर्मचाºयांनी बुधवारी दांडी मारणेच पसंत केले. आॅफिसला आलेल्यांनी दुपारी तीन - चारनंतर कार्यालय सोडून घरचा रस्ता धरला. अनेक खासगी कंपन्यांनी आज कर्मचाºयांना सुट्टी जाहीर केली होती.
२९ आॅगस्ट रोजी रेल्वेच्या थांबलेल्या गाड्यांचा एकूण कालावधी हा मध्य रेल्वेच्या बाबतीत १९ तास, पश्चिम रेल्वेच्या बाबतीत ४.३५ तास, तर हार्बर रेल्वेच्या बाबतीत २१.५ तास होता. मंगळवारी मध्य व हार्बर रेल्वेच्या बाबतीत १५ ते २० मिनिटांचा विलंब वगळता, रेल्वे सेवा प्रभावित झाली नाही, अशी माहिती संबंधित रेल्वे अधिकाºयांकडून मिळाल्याचा दावा पालिकेने केला आहे.

Web Title: Rain ... rain ... and rain, life-threatening disorder: risk of recruitment is avoided; 35 thousand employees of municipal corporation deployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.