राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; 14 ऑक्टोबरपर्यंत कडाडणार अन् गडगडणारही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 06:34 AM2022-10-10T06:34:25+5:302022-10-10T06:35:03+5:30

परतीचा पाऊस अद्यापही राज्यात दाखल झालेला नाही. तो गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह उत्तरेकडील राज्यात आहे.

Rain stay extended in the Maharashtra; Till 14th October there will be thunder and lightning | राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; 14 ऑक्टोबरपर्यंत कडाडणार अन् गडगडणारही

राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; 14 ऑक्टोबरपर्यंत कडाडणार अन् गडगडणारही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : मुंबईसह राज्याला ऑक्टोबर महिन्यातही झोडपून काढलेल्या पावसाने रविवारी सुटी घेतली तरी १४ ऑक्टोबरपर्यंत राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. बहुतांशी जिल्ह्यांत विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

परतीचा पाऊस अद्यापही राज्यात दाखल झालेला नाही. तो गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह उत्तरेकडील राज्यात आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस महाराष्ट्रात दाखल होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्याला लेटमार्क लागला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबादसह विदर्भातील जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शांत वारा, कमी विजा व गडगडाटविना असे थोडेसे वेगळे स्वरूप घेऊन होणारा पाऊस कदाचित आठवडाभर देशाच्या इतर जवळपास ७० टक्के भाग कव्हर करण्याबरोबरच महाराष्ट्रातही कोसळण्याची शक्यता जाणवते. हवामान बदलामुळे परतीचा पाऊस पुन्हा जागीच खिळलेला आहे.     - माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अधिकारी

Web Title: Rain stay extended in the Maharashtra; Till 14th October there will be thunder and lightning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस