सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरी, ढगांच्या गडगडाटासह रेकॉर्ड ब्रेक पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 08:06 PM2017-09-10T20:06:45+5:302017-09-10T20:06:55+5:30

कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी दुपारी 2 .30 वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गड़गडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. गणेशोत्सवाला प्रारंभ होतानाच सिंधुदुर्गात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर चार दिवस पावसाने विश्रांती घेतली होती.त्यामुळे वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढले होते. तर पुन्हा पावसाने हजेरी लावली होती.

Rain strong rain in Sindhudurg, record break rain with cloud thunderstorms | सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरी, ढगांच्या गडगडाटासह रेकॉर्ड ब्रेक पाऊस

सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरी, ढगांच्या गडगडाटासह रेकॉर्ड ब्रेक पाऊस

googlenewsNext


कणकवली, दि. 10 - कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी दुपारी 2 .30 वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गड़गडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. गणेशोत्सवाला प्रारंभ होतानाच सिंधुदुर्गात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर चार दिवस पावसाने विश्रांती घेतली होती.त्यामुळे वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढले होते. तर पुन्हा पावसाने हजेरी लावली होती.

अनंत चतुर्दशीनंतर गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास विजेच्या कड़कडाटासह पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी पुन्हा उष्णतेचे प्रमाण वाढले होते . तसेच एवढ़्यातच ऑक्टोबर हिटची चाहुल लागायला लागली आहे.
रविवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास कणकवली तालुक्यासह जिल्ह्यातील इतर भागातहि पाऊस झाला. सायंकाळी 5 वाजल्यानंतर पावसाचा जोर ओसरला असला तरी तुरळक सरी अधून मधून कोसळत होत्या. त्यामुळे सतरा दिवसांच्या गणरायाना निरोप देण्यात भाविकाना अडचण निर्माण झाली होती.

दुपारनंतर पडलेल्या या जोरदार पावसाने कणकवली तालुक्यात कुठेही नुकसान झाल्याची नोंद सायंकाळी उशिरा पर्यन्त कणकवली येथील तहसील कार्यालयात करण्यात आलेली नव्हती. सिंधुदुर्गात पावसाने गडगडाटासह दमदार हजेरी लावली. काही ठीकाणी झाडाच्या फांद्या विज वाहिन्यांवर तुटून पडल्याने विज गायब झाली होती. तर ढगाळ वातावरण असल्याने सर्वत्र काळोख पसरला होता. कुडाळमध्येही विजांच्या कडकडाटासह सह पावसाची हजेरी लावली. ⁠⁠⁠⁠⁠सावंतवाड़ी तालुक्यातही मुसळधार पाऊस कोसळला. विजेचा लपंडाव सुरु असल्याने व्यापारी वर्ग हैराण झाला होता.

देवगड तालुक्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. तसाच ढगांचा कडकडाटही सुरु होता. हा पाऊस भात शेतीला फ़ायदेशीर ठरणार का? याविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही शेतकऱ्यांकडून भात चिम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Web Title: Rain strong rain in Sindhudurg, record break rain with cloud thunderstorms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.