राज्यभरात पावसाचा इशारा

By admin | Published: May 9, 2017 02:21 AM2017-05-09T02:21:38+5:302017-05-09T02:21:38+5:30

राज्याच्या अनेक भागात वळीवाचा पाऊस पडत असून येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तर ११ व १२ मे रोजी

Rain Warning across the state | राज्यभरात पावसाचा इशारा

राज्यभरात पावसाचा इशारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्याच्या अनेक भागात वळीवाचा पाऊस पडत असून येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तर ११ व १२ मे रोजी संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी वळीवाच्या धारा कोसळतील, असा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
विदर्भ, मराठवाडा अजूनही उष्णतेने होरपळत आहे. सोमवारी राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४६़४ अंश सेल्सिअस एवढे विक्रमी नोंदले गेले. तर, सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे १९़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ सोलापूर शहराला सायंकाळी जोरदार पावसाने झोडपून काढले. पुण्याच्या काही भागात गारांसह थोडा पाऊस झाला़ सकाळी संपलेल्या २४ तासात वेंगुर्ला १२, सातारा २़६, अहमदनगर १़०, पुणे ०़२ आणि पणजी येथे ०़२ मी. मी. पावसाची नोंद झाली.
अकोला शहर व परिसरात संध्याकाळी साडेआठच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वळीवाने हजेरी लावली. यामुळे ४५ अंश तापमानाचा असह्य उकाडा सहन करणाऱ्या अकोलेकरांना दिलासा मिळाला. बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे, हातरुण व परिसरात जोरदार पाऊस झाला. अकोट तालुक्यातील मुंडगावमध्ये सरी कोसळल्या. अडगाव येथेही पाऊस झाला.
प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) :
पुणे ३९़१, अहमदनगर ४१़९, जळगाव ४३़८, कोल्हापूर ३६़३, महाबळेश्वर ३२़५, मालेगाव ४३़६, नाशिक
३९़३, सांगली ३८, सातारा ३९़५, सोलापूर ४१़८, मुंबई ३५़२, अलिबाग ३६़६, रत्नागिरी ३४़३, पणजी
३४़५, डहाणू ३४़६, औरंगाबाद ४१़८, परभणी ४४, नांदेड ४३, अकोला ४४़१, अमरावती ४२़८,
बुलडाणा ४१़२, ब्रम्हपुरी ४२़५, गोंदिया ४१़४, नागपूर ४२़२, वर्धा ४२़८, यवतमाळ ४३़

Web Title: Rain Warning across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.