मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 06:33 AM2018-02-20T06:33:22+5:302018-02-20T06:33:29+5:30
गोव्यासह संपूर्ण राज्यात २० ते २२फेब्रुवारी दरम्यान हवामान कोरडे राहील, तर २३ फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे
मुंबई : गोव्यासह संपूर्ण राज्यात २० ते २२फेब्रुवारी दरम्यान हवामान कोरडे राहील, तर २३ फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. मंगळवारी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, १८ अंशांच्या आसपास राहील, असाही अंदाज आहे.
सोमवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १२.४ अंश सेल्सिअस होते. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.