राज्यात पुढील चार दिवस पावसाचे, सावधानतेचा इशारा; वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 06:03 AM2022-04-20T06:03:12+5:302022-04-20T06:06:21+5:30

"२१ ते २३ एप्रिलदरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका पाऊस व गडगडाट वातावरण राहील."

Rain, warning for next four days in the state; Storms of wind will blow | राज्यात पुढील चार दिवस पावसाचे, सावधानतेचा इशारा; वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटणार

राज्यात पुढील चार दिवस पावसाचे, सावधानतेचा इशारा; वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटणार

googlenewsNext

मुंबई : राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत असतानाच, आता दुसरीकडे बहुतांश भागांना २३ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा समावेश आहे. या भागात वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहील. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली. तर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात किंचित वाढ झाली आहे.

२१ ते २३ एप्रिलदरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका पाऊस व गडगडाट वातावरण राहील.
    - कृष्णानंद होसाळीकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, हवामानशास्त्र विभाग

येथे पडणार पाऊस :
- २१,२२ एप्रिल : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, लातूर  
- २३ एप्रिल : परभणी, हिंगोली, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. 

Web Title: Rain, warning for next four days in the state; Storms of wind will blow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.