राज्याला पावसाचा इशारा, हवामानातील उल्लेखनीय बदलाचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 06:41 AM2022-06-08T06:41:26+5:302022-06-08T06:46:22+5:30
गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते.
मुंबई : वाऱ्याच्या वेगाने केरळात वेळेपूर्वीच दाखल झालेला मान्सून आता ११ जूनच्या आसपास तळकोकणात दाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, ११ जूनपर्यंत राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल होणार असून, त्यानुसार संपूर्ण राज्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट होती. विदर्भात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात तापमान सरासरीच्या जवळपास होते, मात्र आता पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
८ ते ११ जून
किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. १२ जूननंतर विदर्भालाही हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.